मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या जीवनावर आधारित एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून येत्या २६ एप्रिलला ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडली जाणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. या बहुचर्चित चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे.

हेही वाचा : Video : अभिषेक बच्चनला पहिल्यांदाच भेटली रणबीरची गोंडस लेक राहा कपूर, प्री-वेडिंग सोहळ्यातील Inside व्हिडीओ व्हायरल

रोहनशिवाय यामध्ये संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या टीझरमधील “बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर समाजाचा… कुंकू पुसून तयार राहा” हा संवाद विशेष लक्षवेधी ठरतो.

हेही वाचा : Video: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खानचा पत्नीसह रोमँटिक डान्स पाहिलात का? व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांचे उपोषण, भाषणं, दौरे यांना राज्याभरात मोठा प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुकारलेला एल्गार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या टीजरमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, २६ एप्रिल २०२४ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात होईल.