मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांना या क्षेत्रात करिअर करताना आलेले अनुभव सांगत असतात. काही कलाकारांना काम मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो. मराठी सिनेसृष्टीत आडनावामुळे काम न मिळाल्याच्या तक्राराही कलाकारांकडून होत असतात, पण आपल्याला असा कोणताच अनुभव आला नाही, असं अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी म्हटलं आहे.

अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या सविता प्रभुणे यांनी लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत त्यांनी अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेच्या आईचं पात्र साकारलं होतं, या पात्रामुळे त्या घरोघरी पोहोचल्या. सविता यांना ‘तारांगण’ ला दिलेल्या मुलाखतीत आडनावावरून भेदभाव होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”

सविता प्रभुणे म्हणाल्या, “नाही. मला आतापर्यंत असा अनुभव हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये कधीच आला नाही की तुम्ही विशिष्ट आडनावाचे आहात म्हणून तुम्हाला काम मिळतंय किंवा मिळत नाही. मला उलट या इंडस्ट्रीचा अभिमान आहे की असा भेदभाव कधीच केला जात नाही, म्हणजे मला तरी तसा अनुभव नाही.”

“मी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं”, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाईक यांनी आडनावांवरून मराठी इंडस्ट्रीत भेदभाव होत असल्याचं म्हटलं होतं. तुमचे बऱ्याच चित्रपटात कॅमिओ आहेत, मोठ्या भूमिका नाहीत, असं का? यावर उषा नाईक म्हणाल्या होत्या, “त्याचं कारण मला माहिती नाही. मी स्पष्ट बोलणारी असल्यामुळे सांगते की माझ्या आडनावामुळे मला बऱ्याच ठिकाणी डावलण्यात आलं. मी नाईक आहे. मी अगदी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं. पण माझं तसं नाही झालं. या वयात आल्यानंतर स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. पूर्वी बोलत नव्हते आता मी बोलायला लागले आहे. ते पण स्पष्ट बोलते.”