मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये सायली संजीवचं नाव वरच्या स्थानी घेतलं जातं. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या सायलीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते. मध्यंतरी तिचं नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडशी जोडलं गेलं होतं. ते दोघं रिलेशनशिपमध्ये नाहीत हे सायलीने स्पष्ट केलं असूनही आजही तिच्या पोस्टवर ऋतुराजच्या नावाने नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

सायली संजीव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडिया अकाउंटवर विविध पोस्ट शेअर करत ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. तर आता नुकतीच तिने एका नवीन प्रोजेक्टला सुरुवात केली. ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर करताना तिने सुव्रत जोशी आणि चित्रपटाच्या टीमबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. पण हे फोटो पोस्ट करताना तिने दिलेल्या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ऋतुराजचं नाव घेऊन तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : “मी ज्या मुलांना प्रपोज केलं त्यांनी…” सायली संजीवने प्रेमाबद्दल केला होता मोठा खुलासा

सायलीने आगामी चित्रपटाच्या टीम बरोबरचे तिचे काही फोटो पोस्ट परत लिहिला होतं, “कुठलीही गोष्ट हॅटट्रिकला आली की भारी वाटतं आणि टेन्शन पण येतं! आज आम्ही एकत्र आमच्या तिसऱ्या प्रोजेक्टला सुरुवात केली. यावेळी पुर्णपणे नवे पिच, नवीन संघ आणि नवीन आव्हान… दोन फलंदाज तेच. आता या बॉलला सिक्सर बसेल की विकेट निघेल माहीत नाही पण आम्ही फूल फोकस्ड आहोत.” ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

हेही वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका नेटकऱ्याने लिहिलं, “कसं एकमद जमतंय, उदाहरणं पण क्रिकेटची का?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “टेक्निक चांगली आहे, मात्र यॉर्कर नीट खेळा. ऋतु…जसारखे नीट खेळा. बघा कुणाची ताकद.” तर यासोबतच अनेकांनी तिला तिच्या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पण हा चित्रपट कोणता, तो कधी प्रदर्शित होणार हे अद्याप सायलीने गुलदस्तात ठेवलं आहे. त्यामुळे तिच्या या नवीन चित्रपटासाठी तिचे चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत.