अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं तो सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. रणवीर सिंगसह अनेक फोटोही तो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो. आताही त्याने या प्रमोशनदरम्यान बहुदा हटके ड्रेसिंग स्टाइल करण्याचं ठरवलेलं आहे.

आणखी वाचा – नवऱ्याने केलेल्या अश्लील इशाऱ्यानंतर मानसी नाईकची पोस्ट, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली, “मला कमी लेखू नका”

सिद्धार्थ ‘सर्कस’च्या प्रमोशनदरम्यान एक हटके फोटोशूट केलं आहे. सिद्धार्थला फॅशनच्याबाबतीत विविध प्रयोग करायला आवडतात. आताही त्याने हटके ड्रेस परिधान केला आहे. मात्र त्याच्या हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे सिद्धार्थ सध्या ट्रोल होत आहे.

रंगीबेरंगी शर्ट तसेच त्याच रंगाची पँट सिद्धार्थने परिधान केली आहे. यावर त्याने लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तसेच त्याने शूज घातले आहेत. त्याचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना रणवीर सिंगची आठवण झाली आहे. रणवीरच्या नादी न लागण्याचा सल्ला अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सिद्धार्थला दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीर सिंगच्या नादी लागू नको, वाण नाही पण गुण लागला, रणवीरचा नाद सोड, तुला रणवीर सिंग चावला की काय? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी सिद्धार्थच्या या लूकचं कौतुकही केलं आहे.