मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना अभिनेत्री सुकन्या मोने यांचे पती अभिनेते संजय मोने यांची चित्रपटाबाबत नेमकी काय प्रतिक्रिया होती याबाबतचा खुलासा सुकन्या मोनेंनी केला आहे.

हेही वाचा- Video: ‘बाईपण भारी देवा’ने एका आठवड्यात कमावले १२.५० कोटी, टीमने केलं खास सेलिब्रेशन

‘मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सुकन्या मोनेनी संजय मोनेंबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. सुकन्या मोने म्हणाल्या, “चित्रपट बघितल्यानंतर संजय म्हणाला, कडक चित्रपट केला आहे. काय जागा शोधली आहेस तू सूकन्या. संजयच्या या वाक्याने मला ऑस्कर मिळाल्यासारखं वाटलं. माझा नवरा म्हणून नाही तर फार कमी वेळा तो कुणाचं तरी कौतुक करतो. एखादी कलाकृती आवडली तर तो दिलखुलासपणे सांगतो. त्याबाबतीत तो चिकित्सक आहे. पण त्याच्या या प्रतिक्रियेने मला ऑस्कर मिळवून दिलं आहे.”

हेही वाचा- “चालू प्रयोगातच माझी पॅन्ट घसरली पण…” अशोक सराफांनी सांगितला फिजितीचा ‘तो’ किस्सा

दरम्यान संजय मोने यांनी नुकतंच फेसबुकवर पोस्ट करत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटाबरोबर कलाकारांचेही कौतुक केलं आहे. खरं तर ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता. चित्रपट पाहिल्यानंतर अनुभवायला मिळणारी शीतल झुळूक एप्रिल-मे-जून सुखावह करून गेला असता पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन आणि निर्माता-दिग्दर्शक यांचे विशेष आभार, असे संजय मोने यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- Video : “बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले…”, जिनिलीया आणि रितेश देशमुखचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्त्रीयांवर आधारीत या चित्रपटाचे पुरुष वर्गातूनही कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल सुरू आहेत. या चित्रपटाने पहिल्याच विकएण्डला ६.४५ कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस या चित्रपटाने १२.५० कोटीचा गल्ला जमवला आहे. या कमाईमुळे या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले आहेत.