‘बुगी वुगी’, ‘एकापेक्षा एक’, ‘मी कन्याकुमारी’, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमांच्या माध्यमांतून अभिनेत्री दिशा परदेशी प्रसिद्धीझोतात आली. जवळपास १० वर्ष तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम केलं. दिशा ‘मिस महाराष्ट्र’ स्पर्धेचीदेखील विजेती आहे. ‘स्वाभिमान’ मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. मॉडेलिंग, डान्स, अभिनयाशिवाय तिने कथकमध्येही प्राविण्य मिळवलं आहे. इंडस्ट्रीत सक्रिय असणाऱ्या दिशाला अनेकदा वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला. याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाची २५ वर्ष! करण जोहरच्या भावुक पोस्टवर मराठी अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “राहुल-अंजली नसते तर…”

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिशाने अलीकडेच मीडिया टॉक्स मराठी या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने आयुष्यात आलेले धक्कादायक अनुभव, बॉडी शेमिंग, डिप्रेशनवर केलेली मात यावर आपलं स्पष्ट मत मांडलं. दिशा नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

अगदी लहान वयात भरत अँड डोरीस या ब्रॅन्डपासून दिशाच्या मॉडेलिंगची सुरूवात झाली. जवळपास चार वर्ष तिने या ब्रॅन्डचं प्रतिनिधित्व केलं. फिल्मफेअर, फेमिना अशा अनेक मॅगझिनमध्ये तिचे फोटो यायचे. मॉडेलिंग क्षेत्रात आल्यामुळे अनेकांनी तिला टोमणे मारले, नावं ठेवली. सुरूवातीला खूपच बारीक असल्याने तिला प्रचंड बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. याविषयी अभिनेत्री सांगते, “फूक मारली की उडून जाशील, पतंग आहेस तू असं मला सर्रास बोललं जायचं. पण, माझ्या प्रोफेशननुसार मला माझी बॉडी तशीच ठेवणं गरजेचं होतं.”

हेही वाचा : Video : १९७५ च्या सदाबहार मराठी गाण्यावर पूजा सावंत आणि वैभव तत्त्ववादीचा रोमँटिक डान्स, नेटकरी म्हणाले…

इंडस्ट्रीत आलेला बॅड टचचा धक्कादायक अनुभव सांगताना दिशा म्हणाली, “एखाद्या कार्यक्रमावरून निघताना आपण हात मिळवतो, मिठी मारतो आणि निघतो. एखाद्या व्यक्तीला फक्त मिठी मारताना खाली काहीतरी टोचतं हा अनुभव मला एकदा-दोनदा नाहीतर अनेकदा आला. केवळ समोर उभं राहिल्यावर काही पुरुषांना एवढा फरक पडतो ही बाब माझ्यासाठी धक्कादायक होती. असंच एकदा शूटिंगच्या सेटवर एका स्टायलिस्टच्या असिस्टंटने मला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा : ठरलं तर मग : सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटणार? जोगतीण सांगणार सत्य, पाहा नवा प्रोमो

View this post on Instagram

A post shared by Dissha Pardeshi (@dishapardeshi_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सेटवर त्या असिस्टंटने मला दोनदा हात लावला… तिसऱ्यांदा त्याने चुकीच्या पद्धतीने हात लावल्यावर मी त्याला थेट कानाखाली मारणार होते. पण, त्या क्षणी मी स्वत:ला कंट्रोल केलं. सेटवर तमाशा नको…कामाचा खोळंबा नको म्हणून शांत राहिले. त्याला खबरदार पुन्हा मला हात लावलास तर, इथून चालता हो असं ठणकावून सांगितलं. अशा गोष्टी अनेकदा होतात माझं दोन तासांचं शूटिंग रखडेल म्हणून मी आपलं काम करून निघून जाण्याचं ठरवलं. अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करू पुढे जायला लागतं.” असं दिशाने सांगितलं.