मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही दिवसांत अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त स्वत:चे वेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. प्राजक्ता माळी, श्रेया बुगडे, अनघा अतुल, सुप्रिया पाठारे, महेश मांजरेकर, निरंजन कुलकर्णी अशा लोकप्रिय कलाकारांनी गेल्या वर्षांत दागिने व हॉटेल व्यवसायात पदार्पण करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे प्रेक्षकांची लाडकी तेजस्विनी पंडित.

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजस्विनीला ओळखलं जातं. आजवर तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पण, आता तेजस्विनी एका नव्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने नुकतंच पुण्यात आलिशान सलोन सुरू केलं आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारं हे पुण्यातील पहिलं सलोन असणार आहे. त्यामुळे याला ‘एम टू एम’ असं नाव देण्यात आलं आहे.

हेही वाचा : फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठमोळ्या अमृता सुभाषने वेधलं लक्ष; नेसलेली ‘ही’ खास साडी; म्हणाली, “गुजराती…”

तेजस्विनीच्या या नव्या व्यवसायाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. अभिनेत्री तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “माननीय राज ठाकरे साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात यासाठी तुमचे खूप खूप आभार! ‘एम टू एम’ हे पुण्यातील पहिलं मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारं सलोन आहे. तुम्ही सुद्धा नक्की या!” अभिनेत्रीने हा नवा व्यवसाय पूनम शेंडे व तिच्या संपूर्ण टीमसह मिळून सुरू केलेला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या संपूर्ण टीमची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by AM to AM Salon (@amtoam_salon)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
siddharth jadhav
सिद्धार्थ जाधवची इन्स्टाग्राम स्टोरी

तेजस्विनीने या सलोनचा व्हिडीओ शेअर केल्यावर मराठी कलाविश्वातील विशाखा सुभेदार, अश्विनी शेंडे या कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवने “तेजस्विनी पंडित, पूनम शेंडे आणि तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन” अशी खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.