आरती अंकलीकर हे संगीत क्षेत्रात अत्यंत अदबीनं घेतलं जाणार नाव आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांचा मोठा वाटा आहे. गेल्या कित्येक दशकांपासून त्या आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आल्या आहेत. अशा या लोकप्रिय शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांनी नुकतीच ‘सकाळ’ वृत्तसंस्थेच्या ‘आमच्या काळी’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अभिनेते उदय टिकेकर यांच्याशी कशी भेट झाली? याविषयी सांगितलं.

हेही वाचा – Video: “रिहाना, अ‍ॅकॉन माझ्यासमोर शेंगा…”, अंबानींनी लेकाच्या प्री-वेडिंगला बोलावलं नाही म्हणून राखी सावंत नाराज, म्हणाली…

आरती अंकलीकर म्हणाल्या, “आमची भेट पोद्दार कॉलेजमध्ये झाली. तेव्हा तो तब्बला वाजवायचा. मी आधी सहा महिने रुईया कॉलेजमध्ये होते. कारण मला गणित घेऊन पुढे पदवी करायची होती. पण ती वेळ माझ्या गाण्यामुळे जमतं नव्हती. मग मी पोद्दार कॉलेजमध्ये कॉमर्ससाठी आले. तेव्हा मी चार्टर्ड अकाउंटेंट करायचं ठरवलं. या कॉलेजमध्ये उदय तब्बला वाजवत असे, फोक डान्समध्ये भाग घेत असे, नाटकात भाग घेत असे, समूह गीतामध्ये गात असे म्हणजे त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग असायचा. इंटर कॉलेजमध्ये स्पर्धा असायच्या तेव्हा तो माझ्याबरोबर तब्बला वाजवत असे. पुढे त्याने तब्बला वाजवायचं सोडून दिलं. मला पटवण्यापुरतं त्यानं तब्बला वाजवला.”

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: मुक्ता-सागरचा रोमान्स सुरू असतानाच घरच्यांची एन्ट्री अन् मग…; नेमकं काय घडणार? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे आरती अंकलीकर, “आम्ही दोघं फक्त कॉलेजमध्येच भेटत असायचो. कारण पुढे मला किशोरीताईंकडे गाणं शिकण्यासाठी जायला लागे. कँटीगमध्ये आम्ही ७ वाजता भेटलो की ८.३० पर्यंत आमच्या गप्पा व्हायच्या. त्यानंतर तो मला बरोबर नऊ वाजता बुलेटवरून किशोरीताईंकडे सोडायला यायचा. त्याच्यामुळे आमचं बाहेर जाणं असं कधी काही झालं नाही. कारण मी संपूर्ण वेळ संगीतासाठी समर्पित केला होता. त्याच्यामुळे आम्ही दीड तासच भेटायचो. त्याने मला प्रपोज केलं.”