एनडीटीव्ही’चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर सध्या समाजमाध्यमात यावरून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मराठीतील प्रसिद्ध गीतकार, लेखक क्षितिज पटवर्धनने यावर पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

क्षितिज पटवर्धन सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचे, चित्रपटांचे तो नेहमीच कौतूक करत असतो. तसेच तो सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतो. पोस्टमध्ये त्याने असं लिहलं आहे, “रवीश कुमारची आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचा सौम्य आणि लोभस प्रांजळपणा. आकांड तांडव रहित सत्य सांगण्याची हातोटी. सवंग लोकप्रियतेसाठी स्वतःची न सोडलेली मर्यादा, आक्रमक असूनही आक्रस्ताळी नसलेली मांडणी, त्यामुळेच noise वाढवणाऱ्या लोकांमध्ये तो कायम voice वाटत राहील!!” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
maha vikas aghadi searching strong candidates for kalyan lok sabha constituency
Kalyan Lok Sabha : शिंदे पिता-पुत्रांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे सुषमा अंधारेंसह ‘या’ युवा नेत्यांच्या नावांची चर्चा

रवीश कुमार हे गेल्या २६ वर्षांपासून एनडीटीव्हीशी संलग्न होते. १९९६ साली पहिल्यांदा ते एनडीटीव्हीच्या संपर्कात आले. तेव्हापासून त्यांनी आपली पत्रकारिता आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून समाजाकडून मोठा पाठिंबा मिळवला. सामान्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. ‘रवीश की रिपोर्ट’ किंवा ‘प्राईम टाईम’ शोच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडली. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे माध्यम विश्वात चर्चा सुरू झाली आहे.