नेटफ्लिक्स वरची अतिशय लोकप्रिय वेब सीरिज ‘मनी हाइस्टने जगाला अक्षरशः क्रेझी केलं आहे. यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतं आहे. या लक्षवेधी चोरांनी तब्बल चार सिझनमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून या सीरिजच्या पाचवा आणि शेवटचा सिझन प्रदर्शित होण्या करता आता काहीच दिवस उरले आहेत. हा सिझन दोन भागात प्रदर्शित होणार आहे यातील पहिला भाग पहिला ३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सीरिजच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी प्रोफेसर म्हणजेच अल्वारो मोर्टे भूमिकेला निरोप देताना भावुक झाला होता.

अल्वारोसाठी, या सिझनचे चित्रीकरण करणे अवघड होते कारण या सिझनमध्ये अधिक तीव्रता आणि अॅक्शन होती तसंच हा सिझन शेवटचा असल्याने तो या भूमिकेला निरोप देणार होता. या बद्दल बोलताना त्याने एका मुलाखतीत सांगितलं की, ” तुम्हाला माहिती आहे की तुम्ही शेवटचं दिवस शूट करत आहात, जे खूप कठीण असतं…करण एकीकडे तुम्हाला सीन शूट करायचा असतो तर दुसरीकडे तुमचं मन तुम्हाला सांगत असत की कदाचित हा तो शेवटचा दिवस आहे जेव्हा तू प्रोफेसरसोबत असणार आहेस? तुम्हाला सांगूही शकत की हा क्षण किती कठीण आहे.”

‘मनी हाइस्ट’या सीरिजच्या जौथ्य सिझनच्या शेवटी अलिसियाने प्रोफेसरला पकडून बंदी बनवलं आहे. आगामी सिझनच्या ट्रेलरकडे पाहून प्रोफेसरला खूप टॉर्चर सहन करावा लागणार असून आता मास्टरमाईंडच्या पश्चातही चोरांची टोळी  बँक ऑफ स्पेनमध्ये त्याच्या शिवाय काम करू शकेल का? या बद्दल बोलताना अल्वारोने एका मुलाखतीत सांगितलं की, “या सीरिजचा शेवट कसा होईल हे सांगू शकत नाही. मात्र हे नक्की की या सिझनमध्ये खूप अॅक्शन, ड्रामा असेल आणि तो खूपच रोमांचक असले. तसचं अभिनेता म्हणून हा अनुभव खूपच फायदेशीर होता. हो थोडसं थकवणारा होता मात्र चांगल्या अर्थाने”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या सीरिजचे भारतीय प्रेक्षक एव्हढे अतुरतेने वाट बघत आहेत की नेटफ्लिक्सने ‘मनी हाइस्ट’च्या फॅन्ससाठी ‘बेला चाओ’ या त्यांच्या एंथमचे देसी व्हर्जन तयार केलं आहे. या गाण्याला ‘जल्दी आओ’ असे नावं देण्यात आलं आहे. या सुपरहिट वेब सीरिज  ‘मनी हाइस्ट’चा पाचवा आणि शेवटचा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यातील पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.