‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर स्वप्नील-मुक्ताची धमाल

सर्व सुपर डान्सर्स स्वप्नील आणि मुक्ताच्या गाण्यांवर परफॉर्म करणार आहेत.

super dancers
‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेने लावली हजेरी
महाराष्ट्रातील सुपर डान्सरचा शोध घेणाऱ्या ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक, नृत्यासह त्यांच्यात असलेले छुपे टॅलेंट, प्रोत्साहित आणि कौतुक करणारे परीक्षक यांसारख्या ब-याच गोष्टींमुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अंतिम फेरीत कोण पोहोचणार, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर ‘मुंबई पुणे मुंबई ३’ची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत परीक्षक अमृता खानविलकरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने या आठवड्यात प्रेक्षकांना स्पेशल एपिसोड पाहायला मिळणार आहे.

सर्व स्पर्धकांनी मिळून अमृता खानविलकरसाठी ‘हॅप्पी बर्थ डे’ गाणं गाऊन तिला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापण्यात आलं आणि प्रत्येक स्पर्धकांने लाडक्या अमृता ताईला वाढदिवसाच्या स्पेशल भेटवस्तूदेखील दिल्या. सेटवर अमृताचा वाढदिवस दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.

वाचा : प्रिया बापट लवकरच देणार ‘गुड न्यूज’

सेलिब्रेशननंतर ‘मुंबई पुणे मुंबई ३’च्या प्रमोशनसाठी आलेल्या स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यासोबत स्पर्धकांच्या गप्पा-गोष्टी रंगल्या. या कार्यक्रमातील परीक्षक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई ३’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यासोबत चित्रपटातील काही किस्से देखील या मंचावर प्रेक्षकांना जाणून घ्यायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, सर्व सुपर डान्सर्स स्वप्नील आणि मुक्ताच्या गाण्यांवर परफॉर्म करणार आहेत.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील आनंदी क्षण आणि स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेसोबत केलेली धमाल प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहे. तर पाहत राहा ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ सोनी मराठी वर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai pune mumbai 3 actor swapnil joshi and mukta barve on super dancer maharashtra set