दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. अजूनही काही थिएटरमध्ये हा चित्रपट हाऊसफुल आहे. अशाच एका चित्रपटात नागराज आणि आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांना सरप्राइज एण्ट्री देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘आटपाट प्रॉडक्शन्स’च्या युट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये नागराज आणि आकाश थिएटरमध्ये सरप्राइज एण्ट्री करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ते चाहत्यांशी संवाद साधतात. “कसा वाटला चित्रपट, आवडला का?” असा प्रश्न नागराज यांनी प्रेक्षकांना विचारला. “मला बरं वाटलं की आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. मी आताच यांच्याकडून माहिती घेतली की हा शो हाऊसफुल आहे. शुभेच्छा तुम्हाला”, असं ते म्हणाले. ‘झुंड’च्या शोला थेट नागराज मंजुळेंनीच हजेरी लावली म्हटल्यावर प्रेक्षक त्यांच्यासोबत फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी पुढे येत होते.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : अमिताभ यांच्या ‘झुंड’ चित्रपटावरून कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी केलं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. नागपुराच्या गल्लीबोळातील शूटिंगची झलक या मेकिंगच्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.