शाहरुख खानच्या ‘पठाण’ची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, पण तरी सगळीकडे याचं अडवांस बुकिंग अगदी जोरात सुरू आहे, शाहरुखचे चाहते तर त्याच्या या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. पहिल्या गाण्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीने कित्येकांच्या भुवया उंचावल्या. बऱ्याच लोकांनी यावर टीका केली तर काही कलाकारांनी या गाण्यावर वेगवेगळे रील्स बनवून या चित्रपटाला आणखी पाठिंबा दिला.

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नम्रता भगव्या रंगाची बिकिनी घालून समुद्रात हॉट डान्स करताना दिसली होती. या व्हिडिओची आणि नम्रताच्या हॉट आणि बोल्ड लूकची प्रचंड चर्चादेखील झाली. अनेकांनी भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे तिला ट्रोलही केलं आहे.

आणखी वाचा : ‘वेड’ फेम जिया शंकरचा तरुणांना सल्ला; म्हणाली “रितेश-जिनिलीया यांच्याकडून शिकावी ‘ही’ गोष्ट”

आता नम्रताने पुन्हा शाहरुख खान दीपिका पदूकोणच्या ‘पठाण’ चित्रपटातील आणखी एका गाण्यावर असाच एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर नम्रताने आकाशी रंगाची बिकिनी परिधान करून एक हॉट डान्स व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या हॉट अवतारात तिला या गाण्यावर थिरकताना बघून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Namrata malla zenith (@namritamalla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. काही लोकांनी तिला पुन्हा ट्रोल केलंय तर काही नेटकऱ्यांना तिच्या या मोहक आणि मादक अदा प्रचंड आवडल्या आहेत. या व्हिडिओ खाली कॉमेंट करत लोकांनी ‘दीपिकापेक्षा ही जास्त शोभली असती’ असं कॉमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकंच नाही तर काही चाहत्यांनी तिला ‘पठाण २’मध्ये पाहायला मिळायची इच्छा व्यक्त केली आहे. नम्रता मल्ला भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा नम्रता तिचे व्हिडीओ व फोटो शेअर करत असते.