एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाची जादू केवळ भारतातच नाही तर जगात पाहायला मिळते आहे. चित्रपटगृहातून घसघशीत कमाई करणारा हा चित्रपट आता ऑस्करमध्ये जगभरातील इतर आंतरराष्ट्रीय चित्रपटांसोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकेतील ‘व्हरायटी’ या आंतरराष्ट्रीय मासिकानुसार ‘आरआरआर’ चित्रपटातील गाणी ऑस्कर पुरस्कारांच्या प्रमुख श्रेणींमध्ये स्पर्धा करणार आहेत. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याचा सर्वोत्कृष्ट मूळ गाणे स्पर्धा विभागात समावेश करण्यात आला आहे. या विभागात मेल ब्रूक्स, बिली आयलीश, लेडी गागा, सेलेना गोमेझ, जॅझमिन सुलिव्हन आणि डायन वॉरेन यांच्या पाच गाण्यांबरोबर या गाण्याची स्पर्धा होऊ शकते, असे या साप्ताहिकाने नमूद केले आहे

दरम्यान, ‘आरआरआर’ हा चित्रपट ऑस्कर २०२३ साठी पाठवला जात असल्याची माहिती देण्यात आली होती. ऑस्करमधील १४ वेगवेगळय़ा विभागांसाठी चित्रपटाचे नाव देण्यात आले असून सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर- डी.वी.वी. दानय्या, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – एस.एस. राजामौली, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – व्ही. विजयेंद्र प्रसाद, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून एन.टी. रामाराव ज्युनिअर आणि राम चरण, सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीसाठी आलिया भट्ट तर सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता म्हणून अजय देवगण यांचा या विभागात समावेश करण्यात आला आहे.

आणखी वाचा – “‘आरआरआर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर…” प्रसिद्ध हॉलिवूड निर्मात्याचं ट्वीट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नाटू नाटू’ या गाण्याचे गीतकार चंद्रबोस असून राहुल सिपलीगुंज, काला भैरवा यांनी हे गाणे गायले आहे. तसेच, ‘आरआरआर’ चित्रपटातील गाणी दिग्गज संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी संगीतबद्ध केली आहेत. लोकांना वेड लावणाऱ्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने तर समाज माध्यमांवर धुमाकूळच घातला होता. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी नृत्य केलेल्या या गाण्याच्या रिल्सही मोठय़ा प्रमाणात केल्या गेल्या. भारतीयच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही नाटू नाटू या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नव्हता. मध्यंतरी लॉस एंजेलिसमधील चायनीज थिएटरमध्ये बियाँड फेस्टचा एक भाग म्हणून ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रेक्षकांना दाखवला गेला त्यावेळी नाटू नाटूह्ण या गाण्यावर प्रेक्षकांनी नाचत-गात व्हिडीओ करत मनमुराद आनंद घेतला होता.