नेटफ्लिक्सची बहुचर्चित वेब सीरिज ‘मनी हाईस्ट’ ही सध्या चर्चेत आहे. ही वेब सीरिज स्पॅनिश भाषेत असली तरी याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सीरिजच्या अनोख्या कथेमुळे यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रोफेसर, ज्याच्याकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. तो वेगवेगळ्या क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून एक मोठी चोरी प्लाॅन करतो. ही चोरी कशी होते, त्यावेळेस काय काय अडचणी येतात यावर तब्बल चार सिझन आहेत. या चारही सिझनने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. लवकरच या सिझनचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता फॅन्स खूप आतुर झाले आहेत. त्यांची हीच आतुरता बघून नेटफ्लिक्सने एक विशेष भेट आणली आहे. त्यांनी भारतीय फॅन्ससाठी खास गाणं तयार केलं आहे.

‘मनी हाइस्ट’चा नवीन सिझनसाठी काही दिवस उरले आहेत. सगळीकडे उत्साह आहे की पुढे काय होणार. प्रोमोज आणि ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यात आता नेटफ्लिक्सने ‘मनी हाइस्ट’च्या भारतीय फॅन्ससाठी ‘बेला चाओ’ या त्यांच्या एंथमचे देसी व्हर्जन तयार केलं आहे. या गाण्याला ‘जल्दी आओ’ असे नावं देण्यात आलं आहे. ‘बेला चाओ’ या गाण्याचे देसी व्हर्जन प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार दिसत आहे. ‘जल्दी आओ’ या गाण्यात अभिनेत्री श्रुती हासन, राधिका आपटे, अभिनेता राणा डग्गुबती, अनिल कपूर, विक्रांत मेस्सी आणि क्रिकेकटपटू हार्दिक पांड्या दिसत आहेत.

नेटफ्लिक्सने शेअर केलेला म्युझिक व्हिडीओत ‘मनी हाइस्ट’चे काही सिन रिक्रीएट केले आहेत. यात श्रुती हासन नैरोबी सारखी फूल तोंडात घेऊन उभी आहे. तर डेनवर सारखं अनिल कपूर पैश्याच्या बेडवर नाचताना दिसत आहे. राधिका आणि विक्रांत मेस्सी फॅन्सच्या वतीने बोलतं आहेत; ज्याना या सिझनमध्ये अर्टुरो रोमन मरायला हवा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मनी हाइस्ट’च्या आगामी सिझन दोन भागात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पहिल्या भागाचे नावं वॉल्यूम १ असं देण्यात आलं आह. हा पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘मनी हाईस्ट’ ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेण्डिंग सीरिजमधील आहे. भारतातही या सीरिजचे प्रचंड चाहते आहेत. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते याच्याविषयी तरुणींमध्ये फार क्रेझ आहे. या सीरिजचा चौथा सीझन गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये पाचव्या सिझन बाबत उत्सुकता होती. आता अखेर ‘मनी हाईस्ट’ सीरिजचा पाचवा सीझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत.