अभिनेता अक्षय कुमार हा उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहेच, पण समाजिक कार्यातही तो मागे नाही. काही महत्वाच्या विषयांवर लोकांमध्ये जनजागृती घडवण्याचे काम तो करत असतो. विविध समाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या जाहिरातींमध्ये तो झळकत असतो. नुकतेच रस्ता सुरक्षेच्या एका जाहिरातीत त्याने काम केले असून नागरिकांना प्रवास करताना घ्याव्या लागणाऱ्या सुरक्षेची त्याने माहिती दिली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्षयचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : आमिर, अक्षयनंतर अजय देवगणला बॉयकॉट करण्याची होतेय मागणी, जाणून घ्या कारण

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्षय कुमारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सीटबेल्ट आणि एअरबॅगच्या आवश्यकतेकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधत गाडीत सहा एअरबॅग्सची किती आवश्यकता असते हे तो सांगत आहे. ते सांगताना अक्षय कुमार कारमधील एअरबॅगच्या महत्त्वाविषयी चर्चा करताना दिसत आहे. या जाहिरातीत या व्हिडीओमध्ये नुकतंच लग्न झालेल्या मुलीच्या पाठवणीचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. ज्या गाडीमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट उपलब्ध आहे, त्याच गाडीत मुलीची पाठवणी करा, असा आग्रह मुलीच्या वडिलांना अक्षय कुमार करताना दिसत आहे. या व्हिडीओमार्फत प्रवासादरम्यान सुरक्षितेतसाठी सीट बेल्ट लावण्याच्या गरजेबाबत सांगण्याचा प्रयत्न अक्षय कुमारने केला आहे.

“अक्षय कुमार, देशव्यापी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल तुझे आभार. रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्याचे तुझे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत. आम्ही जागरूकता आणि लोकसहभागाने भारतातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे ट्वीट नितीन गडकरी यांनी केले.

हेही वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे ‘ते’ गाणे अखेर आज १७ वर्षांनी झाले प्रदर्शित

यापूर्वीदेखील अभिनेता अक्षय कुमार रस्त्यावरून प्रवास करताना आपली सुरक्षेची काळजी आपण कशाप्रकारे घेतली पाहिजे, हे सांगणाऱ्या अनेक जाहिरातींमध्ये दिसला आहे. आता पुन्हा एकदा अक्षयने या जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती केल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचे आभार मानले आहेत.