लालसिंग चड्ढा या आमिर खानच्या बहुचर्चित चित्रपटाला एकदाचा मुहूर्त लागला खरा मात्र चित्रपटाने फारसे काही यश मिळवले नाही. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच लोकांनी टीकेची झोड उठवली होती. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच बॉयकॉट लाल सिंग चड्ढा असे हॅशटॅग सोशल मीडियावर फिरत होते. चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आमिर खान, करीना कपूर यांनी प्रेक्षकांना विनंती केली खरी मात्र त्याचा फायदा झाला नाही.

आमिर खानने नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल १ तास आमिर आणि राज ठाकरे यांच्यात बोलणी सुरू होती. राज ठाकरे नवीन घरात राहायला आल्यापासून त्यांच्या घरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. आमिर खानने राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थ येथे जाऊन भेट घेतली आहे अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे, मात्र याआधी देखील करण जोहरने राज ठाकरेंची भेट घेतली होती.

“तू तुझ्या तब्येतीवर…” प्रसिद्ध अभिनेत्याने राजू श्रीवास्तवला दिला होता मोलाचा सल्ला

ही घटना आहे २००९ सालातली जेव्हा ‘वेक अप सीड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक वाद निर्माण झाला. मनसे कार्यकर्त्यांनी या चित्रपटाची काही ठिकाणची प्रदर्शनं थांबवायला सांगितली होती. कारण या चित्रपटात मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करण्यात आला होता. मनसे कार्यकर्त्यांच्या मते हा ‘मुंबई आणि महाराष्ट्राच्या लोकांचा अपमान आहे’. मनसेचे हे आंदोलन जास्तच तीव्र होत आहे हे दिसताच करण जोहरने राज ठाकरेंची भेट घेतली.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना करण जोहर असं म्हणाला की ‘बॉम्बे हा शब्द का वापरला हे राज ठाकरेंना समजावून सांगितले. त्यांचे म्हणणे देखील आम्ही ऐकून घेतले. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने आम्ही त्यांची माफी मागितली. इतर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असा आमचा हेतू कधीच नव्हता. मुंबई हा कथेचा अविभाज्य भाग आहे’. करण जोहर यांनी माफी मागितल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेकअप सिड हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. रणबीर कपूर, कोंकणा शर्मा यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी याने केले होते. यातील गाणी खूप प्रसिद्ध झाली आजही अनेकांच्या आवडीची आहेत. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता होता.