ऑस्कर्ससाठी भारतीय चित्रपटांची यादी निश्चित; विद्या बालनबरोबरच विकी कौशलच्या चित्रपटाचाही समावेश

त्यामुळे यातील कोणत्या चित्रपटाची ऑस्करसाठी वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जगभरात ९४ व्या ऑस्कर पुरस्काराची तयारी जोरात सुरु आहे. सिनेसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार भारतातील एका चित्रपटाला मिळावा यासाठी अनेकजण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान येत्या ऑस्कर पुरस्कार २०२२ च्या नामांकनासाठी एकूण १४ भारतीय चित्रपटांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. यात १४ चित्रपटांच्या यादीत बॉलिवूडमधील ‘शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे यातील कोणत्या चित्रपटाची ऑस्करसाठी वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मधील ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी निवड प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली. यात एकूण १४ भारतीय चित्रपटांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत त्यात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘शेरनी’ चित्रपट आणि अभिनेता विकी कौशलचा ‘सरदार उधम’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे. त्यासोबतच प्रादेशिक चित्रपटांमध्ये योगी बाबू यांचा ‘मंडेला’, मल्याळम भाषेतील ‘नयट्टू’ चित्रपटाचे नाव शॉर्टलिस्ट केले गेले आहे. त्यामुळे ऑस्करच्या तिकीटासाठी ‘शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ या दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

दरम्यान दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारच्या नामांकनांसाठी नामांकित केले जाते. मात्र त्यापैकी फक्त एका चित्रपटाला ऑस्करसाठी अधिकृतरित्या प्रवेश दिला जातो. त्यामुळे यंदा ऑस्करचे तिकीट कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यंदाचा सोहळा भव्यदिव्य

ऑस्करच्या नामांकनासाठी निवडलेल्या १४ चित्रपटांपैकी फक्त एका चित्रपटाला ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीसाठी तिकीट दिले जाणार आहे. येत्या आठवड्यात १२ न्यायाधीशांचे एक पॅनल या सर्व चित्रपटांचे परीक्षण करेल. त्यानंतर फक्त एक चित्रपट ऑस्करसाठी नामांकित होईल. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ऑस्कर पुरस्कार हा वर्च्युअली आयोजित करण्यात आला होता. यंदा मात्र हा सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Oscars 2022 nomination sardar udham and sherni get shortlisted for india official oscars 2022 entry nrp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या