OTT Release This Week : बॉलीवूड असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर दर आठवड्याला धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येते. या आठवड्यात ओटीटीवर अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि सीरिज तुमचं मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होणार आहेत.
या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकामागून एक चित्रपट आणि वेब सीरिज येत आहेत. या यादीत हॉलीवूड, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सीरिज समाविष्ट आहेत. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजवर एक नजर टाकूया.
ओजी
पवन कल्याणचा अॅक्शन थ्रिलर, जिथे ओजस गंभीर ऊर्फ ओजी, एक समुराई योद्धा, दोन व्यावसायिकांचे प्राण वाचवतो. या चित्रपटाद्वारे इमरान हाश्मीने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हा चित्रपट २३ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
कुरुक्षेत्र पार्ट २
हा महाभारताचा ॲनिमेटेड सीझन २ आहे, जिथे पांडव आणि कौरवांमधील युद्ध जोरात सुरू आहे. अमिताभ बच्चन यांचा शक्तिशाली आवाज ऐकून तुमचे डोळे पाणावतील. हा चित्रपट २४ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
परम सुंदरी
सिद्धार्थ मल्होत्रा परमची भूमिका करतो, जो दिल्लीचा एक श्रीमंत मुलगा आहे, जो एका एआय ॲपद्वारे त्याच्यासाठीजोडीदार शोधतो आणि केरळची सुंदरी जान्हवी कपूरपर्यंत पोहचतो. हा चित्रपट २४ ऑक्टोबरला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
द कार्दशियन्स सीझन ७
किम कार्दशियन आणि तिच्या बहिणी त्यांच्या ग्लॅमरस ड्रामासह परतल्या आहेत. कौटुंबिक भांडणे, प्रेमकहाणी आणि व्यवसायातील युक्त्या, यावेळी सर्वकाही मसालेदार असणार आहे. ही सीरिज २४ ऑक्टोबरला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
लाजरस
हार्लन कोबेनची ही सीरिज सॅम क्लॅफ्लिन या मानसशास्त्रज्ञाची कथा सांगते, जो त्याच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर जुन्या खून प्रकरणांचा तपास करतो. पण, त्यातला ट्विस्ट असा आहे की, त्याला त्याचे वडील बिल निघी यांचे भूत दिसू लागते. अलेक्झांड्रा रोचची सहाय्यक भूमिकादेखील प्रभावी आहे. ही सीरिज २२ ऑक्टोबरला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.