भारतामधील आघाडीच्या उद्योजक कुटुंबांपैकी एक असणाऱ्या टाटा कुटुंबाच्या आजपर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या वेब सीरिजवर काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मागील २०० वर्षांमध्ये टाटा कुटुंबाने केलेल्या कार्याचा आढावा या वेब सीरिजच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.

चित्रपट निर्मिती करणाऱ्या एका प्रोडक्शन हाऊसने या सीरिजसाठी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘द टाटाज: हाऊ अ फॅमेली बिल्ट ए बिझनेस अ‍ॅण्ड अ नेशन’ या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली जाणार आहे. यासंदर्भातील वृत्ताला ‘अल्मायटी मोशन पिक्चर’ या प्रोडक्शन हाऊसच्या प्रभलीन कौर संधू यांनी दुजोरा दिला आहे. ‘इकनॉमिक टाइम्स’शी बोलताना प्रभलीन कौर यांनी या सीरिजचे किमान तीन सिझन असतील असं सांगितलंय.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

नक्की काय असणार या सीरिजमध्ये?
“टाटा कुटुंबाने सशक्त समाजाच्या बांधणीसाठी कशाप्रकारे योगदान दिलं यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही या सीरिजच्या माध्यमातून करत आहोत. या सीरिजमधून केवळ टाटांनी एक मोठा उद्योग समूह कसा उभा केला यावर भाष्य केलं जाणार नसून त्यांनी आपल्या राष्ट्र उभारणीमध्ये कशाप्रकारे योगदान दिलं हेदेखील दाखवलं जाणार आहे,” असं संधू म्हणाल्या.

कथानक कसं असणार?
या सीरिजमध्ये केवळ टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचाच प्रवास दाखवला जाणार नसून त्यांच्या पूर्वजांचा तसेच त्यांच्या संपूर्ण पारशी कुटुंबाच्या इतिहासाचा आढावा घेतला जाणार असल्याचं संधू म्हणाल्या. प्रोडक्शन टीमने या संदर्भातील संशोधन आणि माहिती संकलन करण्यास सुरुवात केलीय. “या सीरीजच्या लेखनाचं काम सुरु झालं आहे. पुस्तकामधील कथन करण्यात आलेल्या कथानकाप्रमाणेच या सिरीजचं कथानक असणार आहे,” असं या वेब सीरिजशी संबंधित अन्य एका व्यक्तीने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलं.

चित्रीकरण कधी?
सहा ते सात महिन्यांमध्ये या सीरिजचं प्रत्यक्ष चित्रीकरण सुरु होणार आहे. सीरिजचं कथानक लिहून झाल्यानंतर या सीरिजसाठी कास्टिंग केलं जाणार आहे. रतन टाटा यांची भूमिका कोण साकारणार? इतर भूमिका कोण साकारणार हे कथानक लिहून झाल्यानंतर निश्चित केलं जाईल, असं या सीरिजशी संबंधित प्रोडक्शन हाऊसच्या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे.

“एवढ्या प्रदीर्घ आणि संपन्न प्रवासाची कथा सांगण्याच्या प्रयत्नाला आम्ही संपूर्ण संशोधन केल्याशिवाय न्याय देऊ शकत नाही. एका टीमला स्क्रिप्ट लिहिण्याचं काम देण्यात आलं आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात होईल,” असं या प्रोजेक्टशी संबंधित व्यक्तीने सांगितलं आहे.