Maidaan OTT Release: अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट १० एप्रिल रोजी ईदला प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फार चागंली कमाई केली नाही. अक्षय कुमारचा ‘बडे मियां छोटे मियां’ व ‘मैदान’ यांच्यात क्लॅश झाला होता. दोन्ही चित्रपटांना ईद किंवा वीकेंडचा काहीच फायदा झाला नाही. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्यानंतर आता अवघ्या एका महिन्यात ‘मैदान’ चित्रपट ओटीटीवर एका ट्विस्टसह आला आहे.

अमित शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणची मुख्य भूमिका होती, तर यात अभिनेत्री प्रियामणी होती. २३५ कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ७० कोटी रुपये कमावले. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांना आवडेल की नाही ते लवकरच कळेल.

परेश रावल यांच्या पत्नीला पाहिलंत का? एकेकाळी ‘मिस इंडिया’ जिंकणाऱ्या स्वरूप आता काय करतात? जाणून घ्या

प्राइमवर बघता येणार सिनेमा, पण…

अजय देवगण आणि प्रियामणीचा ‘मैदान’ प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही सबटायटल्ससह रिलीज करण्यात आला आहे. पण त्याच्या रिलीजमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओचं सबस्क्रिप्शन असूनही फ्री मध्ये पाहता येणार नाही. यासाठी तुम्हाला ३४९ रुपये मोजावे लागणार आहे. होय ‘मैदान’ प्राइम व्हिडिओवर रेंटवर पाहता येईल. तुम्हाला हा चित्रपट प्राइमवर मोफत पाहायचा असेल, तर तुम्हाला आणखी दोन आठवडे वाट पाहावी लागेल. हा चित्रपट दोन आठवड्यांनंतर मोफत प्रदर्शित होईल.

पद्मश्री, पद्मभूषण अन् ५ राष्ट्रीय पुरस्कार, सलग २५ सुपरहिट देणारा सुपरस्टार; OTT वर आहेत मोहनलाल यांचे ‘हे’ चित्रपट

बायोपिक आहे ‘मैदान’

‘मैदान’ हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. हा भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. अजयने यात सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट समीक्षकांना खूप आवडला होता आणि त्यांनी त्याचं कौतुकही केलं होतं, पण लोकांनी मात्र या सिनेमाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं.

Video: पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलं लग्न, दुसऱ्यांदा आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव केलं जाहीर

क्लॅशमुळे झालं नुकसान

अजय देवगनचा ‘मैदान’ चित्रपट व अक्षय कुमारचा ‘बड़े मियां छोटे मियां’ दोन्ही चित्रपटांचा क्लॅश झाला. त्यामुळे अजयच्या सिनेमाला मोठा फटका बसला. कारण दोन्ही चित्रपट एकामागे एक दोन दिवसात रिलीज झाले, त्यामुळे प्रेक्षक विभागले गेले. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर झाला. फक्त ‘मैदान’च नाही तर ‘बड़े मियां छोटे मियां’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला.