Top 10 Most Viewed Films On Netflix : ओटीटीवर कोणते नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत किंवा कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक पसंती मिळत आहे याबद्दल अनेकदा सिनेमा प्रेमींमध्ये चर्चा होत असते. अनेक जण विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळे चित्रपट पाहत असतात. अशातच आता आम्ही तुम्हाला सध्या नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटांची यादी सांगणार आहोत.
RRR – RRR
हा गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस राजामौली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट पाहायला मिळतात. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला. तर प्रदर्शनाच्या ३ वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आजही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट अनेक जण पाहात आहेत. ‘न्यूज १८’च्या अहवालानुसार जवळपास ४३.६५ मिलियन लोकांनी चित्रपटाला पसंती दिली आहे.
जवान
बॉलीवूडचा बादशा शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो चित्रपट म्हणजे ‘जवान’. शाहरुखच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरला. यामुळे त्याला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तर नेटफ्लिक्सवर सध्या हा ३१.९० मिलियन लोक हा चित्रपट पाहत आहेत.
गंगू बाई काठियावाडी
बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टचा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला तुफान प्रतिसाद दिलेला. तर आजही या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असून सध्या २९.६४ मिलियन इतके लोक हा चित्रपट पाहत आहेत. या चित्रपटासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. यातील तिची भूमिका, अंदाज या सगळ्यांमुळे तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकंली होती. लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी याचं दिग्दर्शन केलेलं.
लापता लेडीज
दिग्दर्शिका किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा २०२४मध्ये बॉलीवूडमधील हिट चित्रपटांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला तर आजही नेटफ्लिक्सवर २९.५० मिलियन लोक हा सिनेमा पाहत आहेत.
अॅनिमल
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी बराच चर्चेत होता. यामध्ये रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना व तृप्ती डिमरी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेल्या. २९.२० मिलियन लोक सध्या नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहत आहेत.
Crew
अभिनेत्री तबू, करीना कपूर व किर्ती सेनॉन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट अनेक जण आजही आवडीने पाहत आहेत. २९ मार्च २०२४मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला तर आता ओटीटीवर २७.९० मिलियन लोकांची याला पसंती मिळताना दिसतेय.
महाराजा
दाक्षिणात्य अभिनेते विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असलेली पाहायला मिळाली. आजही २७.१० मिलियनच्या संख्येत लोक हा चित्रपट पाहत आहेत.
फायटर
दीपिका पादुकोन, हृतिक रोशन व अनिल कपूर यांच्या महत्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला. सिद्धार्थ आनंदने हा चित्रपट दिग्दर्शित केलेला. हृतिक रोशन व दीपिका पादुकोन यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २६.३० मिलियन इतके लोक पाहत आहेत.
लकी भास्कर
दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमानची मुख्य भूमिका असलेला ‘लकी भास्कर’ हा सिनेमा ऑक्टोबर २०२४मध्ये प्रदर्शित झालेला. सध्या नेटफ्लिक्सवर २६.३० मिलियन लोकांची याला पसंती मिळत आहे.
शैतान
अजय देवगण, आर. माधवन व दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका यांचा ‘शैतान’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट अनेकांच्या चर्चेचा विषय ठरलेला तर आताही २४ मिलियन इतके लोक हा चित्रपट पाहत आहेत आणि नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या १० चित्रपटांच्या यादीत याचा समावेश आहे.