Year Ender 2024: २०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी खूप चांगलं राहिलं. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तर वेब सीरिज व मालिकांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. २०२५ ची चाहूल लागली आहे. अशातच मागे वळून या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या काही उत्तम वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात. संजय लीला भन्साळींचे ओटीटी पदार्पण असलेली ‘हीरामंडी’ असो किंवा पंकज त्रिपाठींची ‘मिर्झापूर 3’ असो, या सीरिज खूप गाजल्या. अशाच गाजलेल्या सीरिजच्या यादीवर एक नजर टाकुयात.

पंचायत 3

Panchayat Season 3 on Prime Video : जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव या कलाकारांच्या भूमिका असलेली ‘पंचायत 3’ यंदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. आधीचे दोन सीझन हिट झाल्यानंतर लोक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांची उत्सुकता पाहून निर्मात्यांनी २०२४ मध्येच ती प्रदर्शित केली. ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओच्या सर्वोत्कृष्ट सीरिजपैकी एक आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ९ रेटिंग मिळाले आहे.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!

हेही वाचा – कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”

हीरामंडी

Heeramandi on Netflix: ‘हीरामंडी’ ही या वर्षातील बहुप्रतिक्षीत सीरिजपैकी एक होती. सोनाक्षी सिन्हा, शर्मीन सहगल, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा आणि मनीषा कोईराला अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही सीरिज संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली होती. या सीरिजच्या माध्यमातून त्यांनी ओटीटीवर पदार्पण केलं. ही सीरिज खूप गाजली होती, तुम्हाला ती नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

कोटा फॅक्टरी

Kota Factory Season 3 : ‘कोटा फॅक्टरी’ ही नेटफ्लिक्सवरील सर्वोत्तम सीरिजपैकी एक आहे. आधीच्या दोन्ही सीझनप्रमाणे यंदा आलेला तिसरा सीझनही गाजला. यात कोटामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. यामध्ये ‘पंचायत’ फेम जितेंद्र कुमारची मुख्य भूमिका आहे.

हेही वाचा -‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन

मिर्झापूर 3

Mirzapur Season 3: ‘मिर्झापूर सीझन 3’ ही २०२४ ची बहुप्रतिक्षित वेब सीरिज आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फझल यांसारखे अनेक दिग्गज कलाकार आहे. मिर्झापूर ही प्राईम व्हिडीओची एक सुपरहिट सीरिज आहे. आधीचे दोन भाग गाजल्यानंतर यंदा तिसरा सीझन आला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

गुल्लक सीजन 4

Gullak Season 4 on OTT: ‘गुल्लक’चे आधीचे तीन सीझन हिट झाल्यानंतर त्याचा चौथा भाग यावर्षी जूनमध्ये प्रदर्शित झाला. सोनी लिव्हची ही सीरिज लोकांना खूप आवडली. यात जमील खान, गीतांजली कुलकर्णी आणि सुनीता राजवार यांच्या भूमिका होत्या.

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

आयसी ८१४ : दी कंदहार हायजॅक

IC 814: The Kandahar Hijack : विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, मनोज पाहवा आणि अरविंद स्वामीसह अनेक कलाकारांच्या भूमिका असलेली ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली होती. ही सत्य घटनेवर आधारित आहे.

द ब्रोकन न्यूज 2

The Broken News Season 2 on OTT : ‘द ब्रोकन न्यूज 2’ मे मध्ये प्रदर्शित झाली होती. यात सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत, श्रिया पिळगांवकर आणि अक्षय ओबेरॉय यांच्या भूमिका आहेत. ही सीरिज झी5 वर उपलब्ध आहे.

हेही वाचा – “मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

कर्मा कॉलिंग

Karmma Calling on OTT : ‘कर्मा कॉलिंग’ ही सीरिज हॉटस्टारवर आहे. यामध्ये रवीना टंडन, नम्रता सेठ, वरुण सूद, विराफ पटेल व रोहित रॉयसह अनेक कलाकार आहेत. या सीरिजची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

या वर्षभरात ‘लुटेरे’, ‘ये काली काली आँखे’, ‘मर्डर इन माहीम’, ‘दिल दोस्ती डिलेमा’, ‘मामला लीगल है’, ‘सिटाडेल हनी बनी’ आणि ‘ठुकरा के मेरा प्यार’ यांसह अनेक वेब सीरिज आल्या, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Story img Loader