भारतीय सिनेसृष्टीचे चाहते जगभरात आहेत. जगातील कोनाकोपऱ्यात भारतात तयार झालेले चित्रपट, वेब सीरिज पोहोचत आहेत. कुठल्याही देशातला प्रेक्षक इतर देशात तयार होणारे चित्रपट व वेब सीरिज ओटीटीच्या माध्यमातून सहजरित्या पाहू शकतो. ज्याप्रमाणे भारतात पाकिस्तानी शोचे चाहते आहेत. त्याप्रमाणे पाकिस्तानात देखील भारतीय चित्रपट, वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीला-रेवतीचा आशा भोसले आणि मोहम्मद रफींच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

अलीकडेच नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या यादीतून स्पष्ट झालं आहे की, पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपट आवडीने पाहिले जात आहेत. नेटफ्लिक्सने २० मे ते २६ मे पर्यंतची कंटेंट यादी शेअर केली आहे. ज्यामध्ये पाकिस्तानात सर्वाधिक पाहिलेले टॉप – १० चित्रपट आहेत. प्रत्येक देशानुसार नेटफ्लिक्सने सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या टॉप – १० चित्रपटाची यादी केली आहे. यामधील पाकिस्तानची यादी आश्चर्यकारक आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने ‘या’ मालिकेतील बालकलाकाराच्या कामाचं केलं कौतुक, म्हणाली, “किती समजून…”

पाकिस्तामध्ये सर्वाधिक प्रमाणात पाहिलेल्या टॉप – १० चित्रपटांमध्ये सात बॉलीवूडचे चित्रपट आहेत. पाकिस्तानातील प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिलेला ‘क्रू’ चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर, कृति सेनेन आणि तब्बूने प्रमुख भूमिका साकारली आहे. दुसरा सर्वाधिक पाहिलेला चित्रपट आहे किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’. हा टॉप-१०च्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अजय देवगण, आर माधवन यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपट ‘शैतान’चा नंबर लागतो.

हेही वाचा – Video: अमिताभ बच्चन-अमृता सिंह यांच्या लोकप्रिय गाण्यावर गौरव मोरेसह जबरदस्त डान्स करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखतं का? पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरच्या बॉयफ्रेंडची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, तब्बल ६ वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिलेल्या टॉप – १० चित्रपटांमध्ये सहाव्या क्रमांकावर ‘लियो’ आहे; दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतिचा हा चित्रपट आहे. त्यानंतर सातव्या क्रमाकांवर शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट आहे. मग रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच नावं आहे. पाकिस्तानात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या टॉप – १० चित्रपटाच्या यादीत सर्वात शेवटी १०व्या क्रमांकावर ’12th फेल’ चित्रपट आहे. पाकिस्तानमध्ये या भारतीय चित्रपटांना अधिक पसंती मिळत आहे.