बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व जोरदार सुरू आहे. हे पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रत्येक आठवड्याला काही ना काही घडतं आहे. नुकत्याच झालेल्या वीकेंडमध्ये घरातून दोन स्पर्धक बाहेर पडले. जैद हैदीद व अविनाश सचदेव हे दोघे रविवार बेघर झाले. असे असताना बिग बॉसनं मिड वीक एविक्शन करून प्रेक्षकांना धक्का दिला आहे. ‘वेड’ फेम जिया शंकरचा बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडली आहे. दरम्यान जाता जाता जियाने तिच्या खासगी आयुष्याबाबत केलेला खुलासा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा- ‘गेम ऑफ थ्रोन्स’ बॉलिवूडमध्ये बनली असती तर ‘हे’ कलाकार दिसले असते महत्त्वाच्या भूमिकेत; AI ने केलेली निवड पहा

‘बिग बॉस’च्या घरात एल्विश यादवशी बोलताना जियाने तिच्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला. जिया म्हणाली, “२० वर्षांपासून मी माझ्या वडिलांशी बोलले नाही. ते कुठे आहेत हेही मला माहीत नाही. मी त्यांचा आवाजही ऐकला नाहीये. त्यांनी दुसरं लग्न केल्यानंतर ते त्यांची दुसरी पत्नी आणि मुलीबरोबर राहतात. ते आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. ते आमची चिंता कशाला करतील? माझ्या वडिलांनी आमच्याबद्दल जाणून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यांना काही फरक पडत नाही,”

हेही वाचा-“ट्रक चालकाने आइसक्रीम देण्याच्या बहाण्याने माझं अपहरण केलं अन्…”, अभिनेत्रीचा लहानपणीच्या घटनेबद्दल खुलासा

दरम्यान, जिया घराबाहेर झाल्यामुळे आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाला टॉप पाच सदस्य मिळाले आहेत. पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे या स्पर्धकांमधून आता दुसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरतं, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.