‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. या नव्या पर्वाला २६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. आतापर्यंत या पर्वात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात अभिनेता वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा यांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये सिद्धार्थ व वरुणने करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा- बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘जवान’ने ओटीटीवरही रचला नवा विक्रम; किंग खानने मानले चाहत्यांचे आभार

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सिद्धार्थ व वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांच्याबरोबर आलिया भट्टची मुख्य भूमिका होती. मात्र, या चित्रपटात आलियाला अभिनेत्री म्हणून घेण्यास सिद्धार्थ व वरुणचा विरोध होता. ‘कॉफी विथ करण’च्या नव्या एपिसोडमध्ये खुद्द करणने याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- नेटफ्लिक्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे अनुराग कश्यपला आलेला दोनदा हार्ट अटॅक; दिग्दर्शकाचा मुलाखतीदरम्यान खुलासा

करण म्हणाला, “मला अजूनही आठवते ‘स्टु़डंट ऑफ द इयर’च्या सेटवर जेव्हा पहिल्यांदा आलिया आली होती, तेव्हा तुम्ही दोघांनी मला तिला कास्ट करू नको, असा मेसेज केला होता. ती खूप लहान आहे, असं तुमचं म्हणणं होतं. पण जेव्हा तुम्ही तीन महिन्यांनंतर तिच्याबरोबर फोटोशूट केला, तेव्हा ती शांत उभी होती आणि त्यावेळी तिनं तुमच्यापैकी कोणाकडेही बघितलंही नाही. ती घाबरली होती की लाजत होती ते माहीत नाही. पण तुम्ही दोघं मला पहिल्यापासून ओळखत होता; पण ती मला बिलकूल ओळखत नव्हती. तुम्हा दोघांची इच्छा नव्हती की, मी तिला चित्रपटात घ्यावं. तुम्ही मला दुसऱ्या मुलींचे फोटो पाठवत होतात.”

‘कॉफी विथ करण सीझन ८’च्या पहिल्या भागात दीपिका पदुकोण आणि रणवीर कपूर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्या भागात देओल बंधू सनी देओल व बॉबी देओल यांनी हजेरी लावत इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले होते. तिसऱ्या भागात अनन्या पांडे व सारा अली यांनी हजेरी लावत त्यांच्या लव्ह लाइफ, ब्रेकअपसह अनेक गोष्टींचे खुलासे केले होते. त्यानंतर मागच्या आठवड्यात करीना व आलिया भट्ट यांनी हजेरी लावली होती.

Story img Loader