मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. क्रांतीने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडत कलाविश्वात नाव कमावलं. जत्रा, काकण, खोखो, नो एन्ट्री अशा अनेक चित्रपटांतून क्रांतीने अभिनयाचा ठसा उमटवला. क्रांती रेनबो हा नवाकोरा मराठी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात उर्मिला कोठारे, सोनाली कुलकर्णी, शरद केळकर आणि ऋषी सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

क्रांती रेडकरने व उर्मिला कोठारेने रेनबो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना क्रांती व उर्मिलाने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं. या मुलाखतीतील रॅपिड फायरमध्ये क्रांतीला काही व्यक्तींची नावं सांगण्यात आली. जराही वेळ न दवडता क्रांतीला त्या व्यक्तीचं वर्णन एका शब्दांत करायचं होतं.

हेही वाचा>> ५६ व्या वर्षी वडील झालेल्या सतीश कौशिक यांना वाटायची खंत, म्हणाले होते “मुलीमागे पळणं मला…”

उर्मिला कोठोरचं नाव घेताच क्रांती “अत्यंत काळजी घेणारी” असं म्हणाली. त्यानंतर समीर वानखेडेंचा उल्लेख क्रांतीने “निडर व जांबाज” असा केला. अक्षय बदार्पूरकर यांच वर्णन तिने “यारो का यार” असं केलं. अमृता संत असं विचारताच क्रांती “बहीण” असं म्हणाली. आदिनाथ कोठारेला “हुशार मुलगा” तर केदार शिंदेंचं नाव घेताच “टॅलेंटेड” असं क्रांतीने सांगितलं. यानंतर राष्ट्रावादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्याबद्दल विचारताच क्रांतीने “यावर बोलणं मला गरजेचं वाटत नाही” असं उत्तर दिलं.

हेही वाचा>> “…अन् मी शाहरुख खानला १७ वेळा धडकले”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रांती रेडकरने एनसीबी अधिकारी असलेल्या समीर वानखेडेंशी २०१७ मध्ये विवाह केला. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आले होते. नवाब मलिक यांनी वानखेडे खोटारडे असल्याचं म्हणत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.