अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘छापा काटा’ हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट घरबसल्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नव्हता, त्यांना हा आता ओटीटीवर पाहता येईल.

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

“मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या जोडीला कायमच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असून त्यांच्या विलक्षण जोडीचा हा सहावा चित्रपट आहे. सहकुटुंब मनसोक्त आनंद घ्यावा असा ‘छापा काटा’ प्रेक्षकांना सुपूर्त करताना आनंद होत आहेच, त्याबरोबर प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची उत्सुकता आहे,” असं अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

‘सीता और गीता’मधील ‘ती’ हेमा मालिनी नव्हेच! रोहित शेट्टीने केला गौप्यस्फोट, म्हणाला, “पंख्यावर बसलेली दिसतेय ती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर, सुनिधी चौहान आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजातील गाणी या चित्रपटात आहेत.