‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यांसारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. कविता, वेबसीरिज आणि चित्रपटाद्वारे ते कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. विजू माने यांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्यान स्ट्रगलर साला या वेबसीरिजबद्दल एक किस्सा सांगितला आहे.

विजू माने, कुशल बद्रिके आणि अभिजीत चव्हाण यांनी भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत विजू माने यांनी मनसे नेते अमेय खोपकर यांनी आम्हाला फोन करुन धमकी दिली, असा खुलासा केला. त्याबरोबरच त्यांनी यामागचे कारणही सांगितलं.
आणखी वाचा : खळखळून हसवणाऱ्या दादा कोंडकेंचं खरं नाव काय? जाणून घ्या नावामागची कहाणी

“स्ट्रगलर साला या युट्यूबच्या एपिसोडमुळे आम्हाला धमक्या येतात. मनसे नेते अमेय खोपकर यांनी मला फोन करुन धमकी दिली होती. मी स्पीकर फोन चालू करुन कुशल बद्रिके आणि अभिजित चव्हाण यांना तो ऐकवला होता.

त्यावेळी अमेय खोपकर म्हणाले, ओ माने साहेब, काय चाललंय तुमचं. आता आम्ही काय करु. तुमचा नवीन एपिसोडच येत नाही, याला काय अर्थ आहे. त्यावर कुशल बद्रिकेने हो सर करतो आम्ही. तारीख जुळवून करतो सर असे म्हटले होते”, असा किस्सा विजू माने यांनी सांगितला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान विजू माने, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण यांची स्ट्रगलर साला’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. या वेबसिरीजचे अनेक एपिसोड आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या वेबसिरीजला प्रेक्षकही भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत.