विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’प्रमाणेच रिषभ शेट्टी दिग्दर्शित कन्नड चित्रपट ‘कांतारा’बद्दल चांगलं आणि वाईट बरीच चर्चा झाली. बऱ्याच लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर काहींना यावर सडकून टीका केली. पण या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. १६ कोटीच्या बजेटमध्ये या चित्रपटाने तब्बल ४०० कोटींची कमाई केली. कन्नड चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून कांताराकडे पहिलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० सप्टेंबरला ‘कांतारा’ हा प्रथम फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला, पण नंतर अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर खास लोकाग्रहास्तव हा चित्रपट हिंदी आणि तामीळमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर या चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली आणि तेलुगूमध्येसुद्धा हा चित्रपट डब करण्यात आला.

आणखी वाचा : KBC 14 : “गंभीर सीनच्यावेळी काजोल…” बिग बींनी सांगितला ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा

हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू असतानाच याच्या ओटीटी रिलीजबद्दल चर्चा सुरू होती. नुकताच हा चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, पण या प्लॅटफॉर्मवर तो चित्रपट केवळ ४ दाक्षिणात्य भाषांमध्ये उपलब्ध आहे. तेव्हापासून लोक या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची मागणी करत आहेत. नुकतंच खुद्द रिषभ शेट्टीने याविषयी खुलासा केला आहे.

ट्विटरवर रिषभचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ‘कांतारा’ हिंदीत कधी बघायला मिळणार या प्रश्नाला उत्तर देताना त्याच्या नाकी नऊ आले आहेत. याचं उत्तर त्याने याच व्हिडिओमध्ये दिलं आहे. ‘कांतारा’ ९ डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य भाषेत प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे तर याचं हिंदी डब व्हर्जन नेटफ्लिक्सवर येणार आहे. यासाठी कांताराचे चाहते आणि सिनेप्रेमी हे प्रचंड उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most popular kannad movie kantara hindi dubbed version will be available soon on ott avn
First published on: 06-12-2022 at 20:49 IST