रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही नवीन वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

‘इंडियन पोलीस फोर्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर यामधील मराठी कलाकारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यापूर्वी रोहित शेट्टीच्या सिम्बा चित्रपटात प्रेक्षकांना अनेक मराठी कलाकार पाहायला मिळाले होते. आता ‘इंडियन पोलीस फोर्स’च्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना सुचित्रा बांदेकर, वैदेही परशुरामी, शरद केळकर या मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “वयाच्या चाळीशीनंतर…”, बॉबी देओलच्या ‘अ‍ॅनिमल’मधील भूमिकेबद्दल उपेंद्र लिमये म्हणाले, “तो प्रचंड भावुक…”

‘इंडियन पोलीस फोर्स’च्या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्राची धमाकेदार अ‍ॅक्शन, दमदार अभिनय आणि जबरदस्त संवाद सर्वाचं लक्ष वेधून घेतात. याशिवाय प्रेक्षकांना या सीरिजमध्ये सिद्धार्थ व शिल्पा शेट्टीची जुगलबंदी पाहायला मिळेल.

हेही वाचा : ५५ व्या वर्षी जिंकली भारतातील विवाहित महिलांची सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा, मुंबईच्या रुपिका ग्रोव्हरने मिळवलं मोठं यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही सीरिज येत्या १९ जानेवारी पासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रसारित करण्यात येणार आहे. या निमित्ताने रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे सध्या या सीरिजची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.