Saif Ali Khan disagrees with Akshay Kumar: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अक्षय कुमार हे ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या टॉक शोमध्ये लवकरच एकत्र दिसणार आहेत. ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये अनेक कलाकार हजेरी लावताना दिसत आहेत.

या आधी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट व वरुण धवन, सलमान खान व आमिर खान या कलाकारांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये कलाकार त्यांच्या आयुष्यातील, व्यावसायिक आयुष्यातील अनेक घटना, आठवणी सांगतात. त्यांच्या मैत्रीचे किस्से, एखाद्या गोष्टीबाबत त्यांचे विचार, मत, दृष्टीकोण याबाबत खुलेपणाने ते व्यक्त होतात. तसेच ट्विंकल व काजोल आलेल्या पाहुण्यांबरोबर काही गेम्सदेखील खेळतात.

आता या शोचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये सैफ अली खान व अक्षय कुमार यांनी हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोमधील सैफ अली खानचे एक वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे. सैफ अली खान नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊयात…

“मी नेहमीच त्याला प्रश्न…”

प्रोमोच्या सुरुवातीला काजोल ट्विंकलला विचारते की तू पहिल्यांदाच पती अक्षयची मुलाखत घेत आहेस, तर तुला काय वाटत आहे? त्यावर ट्विंकल उत्तर देते, “मी नेहमीच त्याला प्रश्न विचारत असते. त्याच्याकडून गोष्टी जाणून घेत असते.” त्यावर सैफ अली खान व काजोल हसत असल्याचे दिसत आहे.

प्रोमोमध्ये अक्षय असे विचारतो की कोणाला असे वाटते की नवऱ्यांचा खर्च जास्त असतो? त्यावर सुरुवातीला अक्षय आणि सैफ अली खान यांनी पत्नींचा खर्च जास्त असतो, यावर सहमती दर्शवली. पण, त्यानंतर सैफ अली खान त्याचे मत बदलताना दिसला. अक्षयला सोडून तो काजोल व ट्विंकलच्या बाजूने जाऊन उभा राहिला. काजोल व ट्विंकलच्या म्हणण्यांनुसार नवऱ्यांचा खर्च जास्त असतो.

जेव्हा अक्षय कुमार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी सैफ अली खान त्याला म्हणाला की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मी तुझ्याबरोबर राहत नाही. करीना जेव्हा हे उत्तर ऐकेल तेव्हा ती त्यावर काय प्रतिक्रिया देईल, या विचाराने सैफ अली खानने त्याचे मत बदलल्याचे दिसले. त्याच्या या वक्तव्यानंतर काजोल व ट्विंकल मोठमोठ्याने हसताना दिसल्या.

प्रोमोमध्ये पुढे अक्षय व सैफ यांच्यात गमतीजमती चालू असल्याचे दिसत आहे. अक्षय म्हणतो की लग्नानंतर माझे नशीब बदलले. त्यावर सैफ म्हणतो की लग्नाआधीसुद्धा तुझे नशीब चांगले होते.

दरम्यान, आता अक्षय कुमार आणि सैफ अली खान आणखी काय बोलणार, एकमेकांबाबत काय सांगणार, हे पाहण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.