२०२१ मध्ये विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्याने उधम सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये कतरिना आणि विकी यांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर त्याने काही महिने ब्रेक घेतला. लवकरच त्याचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन या निर्मिती संस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे. या निमित्ताने पहिल्यांदा करणने निर्माता म्हणून काम करणाऱ्या चित्रपटामध्ये विकी कौशल झळकणार आहे. शशांक खैतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर व्हि़डीओ शेअर करत ही घोषणा केली आहे.

आणखी वाचा – “पाकिस्तानी कलाकारांना घ्याल तर…”; मनसेचा पुन्हा बॉलिवूड निर्मात्यांना इशारा

या व्हिडीओमध्ये करण जोहर आणि विकी कौशल एकमेकांसमोर बसले आहेत. गप्पा मारताना करण त्याला “तुझे चित्रपट फार छान असतात. ते लोकांना खूप आवडतात. पण चित्रपटांमध्ये तू क्रांतिकारक, भारतीय लष्करातील कमांडो अशा गंभीर भूमिका केल्या आहेस. तुझं दुख कमी होत नाही का?” असा प्रश्न विचारतो. त्यावर होकार देत विकी “मी गेल्या काही वर्षामध्ये गंभीर शैलीतल्या भूमिका साकारल्या आहेत”, असे म्हणतो.

आणखी वाचा – वडिलांच्या निधनानंतर महेश बाबूने दिली पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाला, “अत्यंत दु:खी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे करण “त्याला तू आता स्टार बनला आहेस, तर आता तुलाही मसाला चित्रपट करायला हवा”, असे म्हणतो. त्याचं बोलणं ऐकून “मला अशा चित्रपटांमध्ये काम करता येईल का?” हे म्हणत विकी त्याच्याकडे पाहायला लागतो. त्यानंतर करण त्याला ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटातील पार्श्वभूमी सांगायला लागतो. कथानक ऐकून “या ऐवजी दुसरा कोणता चित्रपट नाहीये का?” असा सवाल विकी विचारतो. तेव्हा करण “त्याला आहे ना, ‘स्टुडंस ऑफ द इयर ३’ आहे. तू हवं तर त्यामध्ये काम करु शकतोस”, हे उत्तर देतो. ते चेष्टामस्करी करत या चित्रपटाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.