आजकल चित्रपटाच्या प्रदर्शनाप्रमाणेच त्याच्या ओटीटी रिलीजसाठीदेखील आपल्याला उत्सुकता पाहायला मिळते. एखादा चित्रपट कोणत्या ओटीटीवर येणार, त्याचे हक्क कितीला विकले गेले अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटरसिक खूप दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चित्रपटांची वाट पाहत आहेत. त्यापैकी हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ आणि वरुण धवन क्रीती सनॉनचा ‘भेडिया’ हे दोन्ही चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘विक्रम वेधा’ आणि ‘भेडिया’ हे दोन्ही चित्रपट अद्याप कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेले नाहीत कारण हे दोन्ही चित्रपट लवकरच लाँच होणार्‍या जियोच्या नवीन सुपर अॅपवर प्रदर्शित केले जातील. यासोबतच या चित्रपटांसोबतच आणखी काही बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या नवीन अॅपवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी अद्याप समोर आलेली नाही.

आणखी वाचा : ट्वीट करत कंगना रणौतने पुन्हा केली आमिर खानवर टीका; म्हणाली “बिचारा…”

जियोच्या या नवीन अॅपचे नाव Jio Voot असेल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याबरोबरच मराठीतील ‘मी वसंतराव’ हा चित्रपटही कोणत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतल्या नसल्याने तोदेखील जियोच्या याच नवीन अॅपवर बघायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘विक्रम वेधा’ हा चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता, त्यात हृतिक आणि सैफसह राधिका आपटेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. ‘भेडीया’ या चित्रपटात वरूण धवनसह क्रीती सनॉन, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या दोन्ही चित्रपटांना चित्रपटगृहात उत्तम प्रतिसाद मिळाला, ४२ दिवसांहून अधिक काळ लोटल्याने या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल अजूनही ठोस उत्तर समोर आलेलं नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When films like vikram vedha and bhediya will get released on ott platform avn
First published on: 11-02-2023 at 18:16 IST