कलाकार हे सोशल मीडियावर मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. कधी कधी त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. पण कलाकार देखील शांत बसत नाहीत. ते ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतात. असेच काहीसे पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल मीरा सेठीसोबत घडले आहे. तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
मीराने शनिवारी आयोजित केलेल्या लक्स स्टाइल अवॉर्ड इवेंटमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या कार्यक्रमात तिने डिझायनर हुसैन रेहरने डिझाइन केलेला आउटफिट परिधान केला होता. तिने परिधान केलेल्या या आऊटफिटमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. पण मीरा देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.
आणखी वाचा : ‘वडिलांचे कृत्य लपवण्यासाठी आईने स्वत:ला संपवले’, नीना गुप्ता यांचा खुलासा
मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यामातून तिने ट्रोलर्सला सुनावले आहे.
‘ट्रोलर्स बऱ्याच वेळा अनेक महिलांच्या फोटोवर अश्लील कमेंट करतात आणि हे पाहणे मजेशीर असते’ असे मीराने म्हटले आहे. पुढे ती म्हणाली, ‘घरी जा, मी तुमच्यासाठी असे कपडे परिधान करत नाही. मी कोणासाठी नाही तर स्वत:च्या आनंदासाठी असे कपडे परिधान करते. तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे.’