scorecardresearch

“मराठी कलासृष्टीसाठी कालचा संवाद….” प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

“मराठी कलासृष्टीसाठी कालचा संवाद….” प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. ‘मला तुमचं ऐकायचंय…! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलुया.., या भेटीदरम्यान त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला. यावेळी मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाबद्दल अभिनेता प्रसाद ओकने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेता प्रसाद ओक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाणी, त्यातील संवाद हे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
आणखी वाचा : “दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर हुबेहुब साकारली होती. या भूमिकेनंतर त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे. यात त्याने या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत प्रसादने त्यांनी दिलेल्या आमंत्रणाचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. याला त्याने फार हटके कॅप्शन दिली आहे.

आणखी वाचा : प्रसाद ओकने दिल्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, ‘धर्मवीर’मधील खास फोटो शेअर करत म्हणाला…

“मला तुमचं ऐकायचं आहे” असं म्हणत काल मा.ना.मुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रातल्या अनेक लोकांशी वार्तालाप केला. अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले गेले. आमच्या अनेक अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. शासकीय पातळीवर संपूर्ण मराठी कलासृष्टीसाठी कालचा संवाद खूपच महत्वाचा ठरेल अशी आशा वाटते. इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमचं ऐकल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे मनःपूर्वक आभार. या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आमचे मित्र सचिन जोशी, विजू माने, आणि मंगेश देसाई यांचेही खूप आभार…!!!, असे प्रसाद ओकने म्हटले आहे.

या दरम्यान निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रशांत दामले, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, श्रीमती वर्षा उसगांवकर, निर्माता विद्याधर पाठारे, मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, गायक अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रातिनिधिक स्वरुपात त्या-त्या क्षेत्रातील समस्या, मुद्यांची मांडणी केली. तसेच याबाबी समजावून घेण्याकरिता आवर्जून आयोजित केलेल्या या संवाद उपक्रमाचे स्वागतही केले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prasad oak share instagram post on cm eknath shinde nrp

ताज्या बातम्या