ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुक करत आहे. नुकतंच अभिनेता प्रसाद ओक याने एबीपी माझाच्या महाकट्टा या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्याने धर्मवीर चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले.

धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या महाकट्टा कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी त्याने चित्रपटातील संवाद, त्याला भावलेला प्रसंग याबद्दल भाष्य केले. तसेच त्याने या चित्रपटाचा दुसरा भागही येणार असल्याची अप्रत्यक्षपणे माहिती दिली.

“…यापुढे कुठलीही अडचण आली तरी मला सांगा”, ‘धर्मवीर’ आनंद दिघेंच्या आठवणीत आदेश बांदेकर भावूक

दिघे साहेबांचे कार्य फार मोठं”

या कार्यक्रमादरम्यान प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या कोणते गुण तुला जास्त आवडले? आणि त्यांच्या भूमिकेबद्दल तू काय सांगशील? प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “दिघे साहेबांचे गुण दाखवण्यासाठी एक चित्रपट अपुरा आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तोपर्यंत आमच्या मनात दुसऱ्या भागाची तयारी सुरु झाली आहे. इतकं मोठं त्यांचे कार्य आहे.”

“कोण जाणे? पण तेव्हा दिघे साहेब नेहमी माझ्या आसपास असायचे…”, प्रसाद ओकने सांगितला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शूटींगचा धक्कादायक अनुभव

“दिघे साहेबांची कामाची एक विशिष्ट पद्धत होती. जर एखादा माणूस पाच वेळा मदतीसाठी आला तर त्याला खरच गरज आहे असे समजले जायचे. त्यावेळी मग त्याची जात, धर्म, पंथ हे काहीही बघितले जायचे नाही. त्याची अडचण सोडवली जायची. हा गुण मला सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो”, असे प्रसाद ओकने सांगितले.

“प्रवीण तरडेंनी संवाद खूप छान लिहिले आहेत. फक्त एक संवाद नाही, अनेक संवाद आहे. पण ते अजून बाहेर आलेले नसल्याने मी ते बोलू शकत नाही. पण मी ते कधी बोलतोय, असे एक अभिनेता म्हणून मला झाले आहे. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचे नाही, असे एक नाही अनेक ताकदीचे डायलॉग लिहिले आहेत”, असेही त्याने सांगितले.

आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त प्रसाद ओकने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला “धर्मवीर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरु शिष्याच्या परंपरेला अधोरिखेत करणार तो सीन

यावेळी त्याला तुला चित्रपटादरम्यान दिघे साहेबांचा भावलेला प्रसंग कोणता याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तर त्यावेळी तो म्हणाला की या चित्रपटात एकनाथ शिंदेंसोबत दिघे साहेब नरीमन पॉईंटला बसले आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे हे प्रचंड दुखात असतात आणि त्या दुखातून बाहेर पडण्यासाठी आनंद दिघे हे नरीमन पॉईंटला घेऊन जातात आणि कृष्ण अर्जुनने जशाप्रकारे तत्वज्ञान सांगितले होते, त्या पद्धतीचे ज्ञान हे दिघे साहेब शिंदे साहेबांसमोर मांडतात. यात गुरुशिष्याची परंपरा दाखवण्यात आली आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेब आणि दिघेसाहेब एकनाथ शिंदे साहेब ही गुरु शिष्य परंपरा जी चालत आली आहे, त्या परंपरेला अधोरेखित करणारा तो एक महत्त्वाचा सीन आहे. हा माझा सर्वात आवडता किंवा लाडका सीन आहे.