मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे प्रशांत दामले. गेली अनेक वर्ष ते विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. याबरोबरच त्यांचा हजरजबाबी पण सर्वांनाच आवडतो. आता एका चाहत्याला त्यांनी त्यांच्या हटके शैलीत उत्तर दिलं आहे.

प्रशांत दामले सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. विशेष करून त्यांच्या कामाबद्दलचे अपडेट्स ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्याबरोबर त्याखाली कमेंट करणाऱ्या काही चाहत्यांना देखील ते उत्तर देताना दिसतात.

आणखी वाचा : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

काल दसऱ्याच्या निमित्ताने प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. यामध्ये ते नाटकाच्या बसची पूजा करताना दिसत आहेत. हे करत असताना त्यांनी काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्सची पॅन्ट परिधान केली होती. परंतु सणाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे त्यांनी घातलेले एका चाहत्याला आवडले नाहीत. चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करत राहिलं, “दामले दादा, चांगले कार्य करताना काळे कपडे नसतात परिधान करायचे.”

हेही वाचा : “मला अशोकमामा प्रेमाने ‘अशी’ हाक मारतो…”; प्रशांत दामले यांनी अनेक वर्षांनी उघड केलं होतं गुपित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर चाहत्याच्या या कमेंटवर प्रशांत दामले यांनी देखील त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, “उघडा कसा येणार.” याबरोबर त्यांनी मस्करी केल्याचे दोन इमोजी दिले. आता प्रशांत दामले यांची ही कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.