scorecardresearch

“मागच्या ४ वर्षांत एका रुपयाचीही कमाई नाही कारण…” आर माधवनचा मोठा खुलासा

आर माधवनचा ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

r madhavan, rocketry the nambi effect, r madhavan net worth, r madhavan last 4 year earning, r madhavan upcoming film, cannes 2022, rocketry the nambi effect screaning at cannes, आर माधवन, आर माधवन नेटवर्थ, रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट, आर माधवन कमाई, आर माधवन आगामी चित्रपट, आर माधवन कान्स २०२२
आर माधवननं स्वतःच्या कमाईबद्दल मोठा खुलासा केला आहे.

अभिनेता आर माधवन सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याचा चित्रपट ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’चा प्रिमियर १९ मे रोजी ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आर माधवननं स्वतःच केली आहे. कान्समधील स्क्रिनिंगनंतर या चित्रपटाला १० मिनिटांचं स्टँडिंग ऑवेशनही मिळालं. आर माधवनच्या या चित्रपटाचं सध्या बरंच कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात खास प्रोजेक्ट आहे. पण आता प्रेक्षकांना हा चित्रपट कितपत आवडेल याची भीती आर माधवनला वाटत आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आर माधवननं त्याच्या मागच्या ४ वर्षांतील कमाईबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यानं मागच्या चार वर्षांमध्ये एका रुपयाचीही कमाई केलेली नाही. मुलाखतीत आर माधवननं यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. आर माधवन म्हणाला, “मला माझ्या आगामी चित्रपटाबाबत खूप भीती वाटतेय. त्याच्या कमाईबाबतही चिंता आहेच. मागची दोन वर्षं करोनामध्ये गेली आणि त्याआधीची दोन वर्षं मी या चित्रपटासाठी दिली. या चार वर्षांमध्ये मी एक रुपयाही कमावलेला नाही.”

आणखी वाचा- “त्यावेळी सगळं प्रमोशनसाठी नव्हतं…” सारासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला कार्तिक आर्यन

आणखी वाचा- Loksatta Exclusive: “सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या पत्नीची इतिहासात नोंदच नाही” प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत

माधवन पुढे म्हणाला, “ओटीटी ही एकमेव गोष्ट आहे ज्याने मला आजपर्यंत सांभाळलं आहे. माझा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘विक्रिम वेधा’ होता. त्यानंतर मी Decoupled या वेब सीरिजमध्ये काम केलं जी ओटीटीवर प्रदर्शित झाली होती. त्यामुळे आता माझा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार की नाही याची चिंता मला आहे.” या मुलाखतीत माधवनने आपल्या पत्नीचे आभार मानले. त्याच्या मते मागच्या चार वर्षांच्या कठीण काळात तिची मोलाची साथ मिळाली.

‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटात आर माधवननं डॉक्टर नम्बी नारायणन यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा एका बायोपिक असून भारतीय वैज्ञानिक आणि एअरस्पेस इंजिनिअर नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांना खऱ्या आयुष्यात गुप्तहेरीच्या खोट्या केसमध्ये फसवण्यात आलं होतं. या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: R madhavan revelas that he has not earned single rupees in the last four years mrj

ताज्या बातम्या