प्रसिद्ध अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच डॅनिश ओपन स्पर्धेत त्यानं पुरुषांच्या ८०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारत रौप्य आणि सुवर्ण अशी दोन पदकं जिंकली. त्यानंतर अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत वेदांतनं त्याच्या सगळ्या यशाचं श्रेय हे आपल्या आई-बाबांना दिलं आहे. पण यासोबतच त्या वडिलांच्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने ओळखलं जावं अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छाही व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वीच आर माधवननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेदांतच्या विजयाची घोषणा आणि सन्मान समारंभाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर वेदांतवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. आर माधवननं देवाचे आभार मानत सर्वांनी वेदांतच्या दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी त्यांचे आभार मानले होते. आपल्या मुलाचा आर माधवनला किती अभिमान वाटतो हे त्याचा सोशल मीडिया पोस्टमधून समजून येत होतं.

आणखी वाचा- “लहान असताना एक मुलगा मला…” लैंगिक शोषणाबाबत कंगना रणौतचा Lock Uppमध्ये धक्कादायक खुलासा

या यशानंतर दूरदर्शन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आर माधवनचा मुलगा वेदांत म्हणाला, “मला माझ्या वडिलांच्या सावलीत राहायचं नव्हतं. मी स्वतःच्या मेहनतीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू इच्छितो. मला केवळ आर माधवनचा मुलगा म्हणून लोकांनी ओळखावं असं अजिबात वाटत नाही. माझ्या या यशात माझ्या आई- वडिलांचा मोठा वाटा आहे. ते नेहमीच माझी काळजी घेतात आणि माझ्यासाठी खूप मेहनत करतात. त्यांनी माझ्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग केला आहे आणि त्यापैकीच एक आहे माझ्यासाठी दुबईमध्ये शिफ्ट होणं.”

वेदांतला उत्तम प्रशिक्षण मिळावं यासाठी आर माधवन आणि त्याचं कुटुंब मागच्या वर्षी दुबईला शिफ्ट झाले आहेत. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत आर माधवन म्हणाला होता, “मुंबईमध्ये मोठे स्विमिंगपूल एक तर करोनामुळे बंद आहे किंवा जे सुरू आहेत तिथे पोहोचायला बराच वेळ जातो. आम्ही आता वेदांतसोबत दुबईला आहोत. ज्या ठिकाणी त्याला उत्तम प्रशिक्षण मिळू शकतं. तो ऑलम्पिकची तयारी करत आहे आणि आम्ही दोघंही त्याच्या सोबत आहोत.”

आणखी वाचा- “सरोगसीमध्ये गमावलं बाळ अन् आई होण्यासाठी…”, अमृता रावनं सांगितला धक्कादायक अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वेदांत माधवननं याआधी मार्च २०२१ मध्ये लॅटव्हिया ओपनमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर मागच्याच वर्षी ज्यूनिअर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये त्यानं सलग ७ पदक (४ रौप्य आणि ३ कांस्य)जिंकण्याची कामगिरी केली होती.