अभिनेता राहुल देवने बऱ्याच चित्रपटांमध्ये ग्रे शेड असलेल्या भूमिका केल्या आहेत. सध्या तो ‘कब्जा’ या कन्नड चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याने हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देवो के देव.. महादेव’ या लोकप्रिय मालिकेमध्येही तो झळकला होता. राहुलने सनी देओलच्या ‘चॅम्पियन’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.

मध्यंतरी राहुल देवची एक मुलाखत फार गाजली होती. या मुलाखतीमध्ये तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बराच वेळ बोलला. हिंदी चित्रपटसृष्टीची सद्य परिस्थिती, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील फरक, कामासाठी केलेला स्ट्रगल अशा अनेक गोष्टींवर त्याला प्रश्न विचारण्यात आले. पुढे मुलाखतकाराने त्याला सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर प्रश्न विचारला. ‘चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील एखाद्या अभिनेत्यामुळे तुमच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे असं तुम्हाला वाटतं का?’ असे राहुलला विचारण्यात आले. त्यावर त्याने ‘बाहेरुन बॉलिवूडमध्ये आलेल्या यशस्वी कलाकारांच्या यशोगाथा फार मोठ्या आहेत’ असे उत्तर दिले.

आणखी वाचा – “विकी-कतरिनाच्या लग्नाला आमंत्रण नसल्याने…” स्वतःच्याच कार्यक्रमात करण जोहरने व्यक्त केली खंत

घराणेशाहीवर बोलताना तो म्हणाला, “सिनेक्षेत्राची पार्श्वभूमी असल्याचे फायदे आहेत. पण ‘बाहेरचे’ असलेले बरेचसे कलाकार बॉलिवूडमध्ये यशस्वी झाल्याचे पाहायला मिळते. त्यांचा स्ट्रगल ही फार प्रेरणादायी असतो. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, विनोद खन्ना यांच्यापासून सलमान, शाहरुख, आमिर आणि अक्षय कुमारपर्यंत असे सगळेच बाहेरुन बॉलिवूडमध्ये आले होते. त्यांनी या क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे.”

आणखी वाचा – आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीदरम्यान त्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायचा अनुभव सांगितला. “दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शकांना मला कोणत्या प्रकारच्या भूमिका शोभून दिसतील हे समजले आहे. ते मला त्याप्रमाणे काम देतात. यामुळे आत्तापर्यंतचा माझा प्रवास फार सुखकर झाला आहे. मी अनेक दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. सुरुवातीला मला फार अडचणी आल्या. पण काही काळानंतर प्रेक्षकांनी माझा स्विकार केला. तेव्हापासून मी त्यांच्या गळ्यातला ताईत बनलो आहे”, असे म्हणत राहुल देवने त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.