बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अनेकांना माहितं नाही की राज कुंद्राचे आधी लग्न झाले होते. त्याच्या पूर्वाश्रमीच्य पत्नीच नाव हे कविता आहे. तर कविताने त्या दोघांच्या घटस्फोटाचे कारण शिल्पा असल्याचे सांगितले होते. दरम्यान, एका मुलाखतीत राजने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या घटस्फोटाचं कारण देखील त्याने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : मनोज वाजपेयीची पत्नी शबानावर नाव बदलण्यासाठी टाकण्यात आला होता दबाव

राजने ‘पिंकव्हिला’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने पूर्वाश्रमीच्या पत्नीपासून विभक्त होण्याचे कारण सांगितले आहे. “आम्ही सगळे माझ्या आई-वडिलांसोबत एकाच घरात राहत होतो. आमच्या सोबत माझी बहीण आणि मेहूणादेखील राहत होते. कारण इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा ते प्रयत्न करतं होते. ती माझ्या त्या मेहूण्यासोबत अधिक वेळ व्यथित करू लागली होती. विशेषतः जेव्हा मी बिजनेस ट्रिपसाठी बाहेर जायचो तेव्हा. माझ्या कुटुंबातील अनेकांनी एवढंच नाही तर माझ्या ड्रायव्हरने देखील त्या दोघांमध्ये काही तरी सुरु आहे असे मला सांगितले. मात्र, मी यावर कधीच विश्वास ठेवला नाही, मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर कधीच संशय केला नाही,” असं राज म्हणाला.

पुढे तो म्हणाला,”जेव्हा मला या गोष्टीबद्दल कळलं तेव्हा मला धक्काच बसला होता. मी विचार करायचो की मी असं काय केलं आहे की माझ्यासोबत असं झालं आणि रडायचो. मी माझ्या गर्भवती बहिणीला सांगितलं की तो फोन नंबर हा कविताचा दुसरा गुप्त फोन नंबर आहे. मी तिला सांगितले की मी कविताला तिच्या घरी सोडणार आहे तिच्यात आणि माझ्यात आता काही राहिलं नाही, तिला काय पाहिजे याचा विचार तिने आधी केला पाहिजे होता.”

आणखी वाचा : अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम

त्याच्या बहिणीने तिच्य पतीबरोबरच राहण्याचे आणि त्याला एक संधी देण्याचा विचार केला. तर राजने पत्नी पासून विभक्त होण्याचे ठरवले. घटस्फोटाच्या वेळी तिच्या मागण्या कमी होत्या मात्र, तिला जेव्हा कळलं की तो शिल्पासोबत रिलेशनशिपमध्ये आहे तेव्हा ती जास्त मागू लागली.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

पुढे त्याने सांगितले की तो सध्या त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या संपर्कात नाही. त्याची बहिण आणि तिचं कुटुंब यासगळ्यात असल्यामुळे या गोष्टीवर मीडियासमोर काही न बोलण्याचा त्याने विचार केला.

शिल्पा आणि राजने २००९ मध्ये लग्न केले आहे. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवान त्यांच्या मुलाचे नाव आहे तर समीक्षा त्यांच्या मुलीचे आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra slams ex wife kavita after her viral shilpa shetty video she had affair with my sister s husband dcp
First published on: 12-06-2021 at 09:14 IST