बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे येत्या काही महिन्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. या दोन जोड्यानंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या जोडीच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.

‘सिटी लाईट्स’ या चित्रपटातील अभिनेता राजकुमार राव आणि त्याची सहकलाकार पत्रलेखा हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ईटाईम्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार राव आणि पत्रलेखा पुढच्या महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच त्या दोघांनी त्यांच्या लग्नाची तारीख पक्की केली आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा येत्या १०, ११ आणि १२ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करोनामुळे त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबातील मंडळी आणि ठराविक नातेवाईक सहभागी होतील असे बोललं जात आहे. तसेच सिनेसृष्टीतील काही मित्रांना या लग्नसोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र अद्याप त्या दोघांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या १० वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार पत्रलेखाबाबत म्हणाला होता, “आमच्याबद्दल अनेक गोष्टी मला वाचायला मिळतात. आमचे लग्न झाले असेही अनेकांना वाटते. मात्र मला हेच सांगायचे आहे की आम्ही रिलेशनशिपमध्ये खूश आहोत. जिमबाहेर आम्ही कशाप्रकारे भांडत होतो अशा अनेक बातम्या वाचल्या होत्या. मात्र त्यांना कधीही प्रतिक्रिया देणे मला गरजेचे वाटले नाही.”