Rakhi Sawant-Adil Durrani: राखी सावंतने अलीकडेच आपला बॉयफ्रेंड आदिलसह लग्न केले होते. पण काहीच दिवसात राखी व आदिलच्या नात्यात कटुत्व आले आहे. राखी अनेकदा मीडियासमोर येऊन आदिलवर आरोप करत असते. आदिलचे दुसऱ्या मुलीसह अफेअर असल्याचे म्हणत त्याने आपल्याला धोका दिल्याचेही राखीचे म्हणणे आहे. त्याच्या अफेअर्समुळेच आपल्या नात्यात दुरावा आल्याचे राखीने मीडियासमोर अनेकदा सांगतले आहे. अखेरीस आता या सर्व आरोपांवर आदिलने स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून सविस्तर उत्तर दिले आहे.
राखी सावंत काय म्हणाली होती?
काही दिवसांपूर्वी राखीच्या आईचे निधन झाल्यावर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. राखी रडताना लग्न तुटल्याचेही दुःख व्यक्त करत आहे. राखीच्या म्हणण्यानुसार तिचा नवीन नवरा आदिलचे अन्य मुलींसह संबंध आहेत म्हणूनच त्याने तिला त्या दोघांचं नातं लपवून ठेवण्यास सांगितलं होतं. राखी म्हणते की, “मी त्याला एक नव्हे १० वेळा संधी दिली पण तो प्रामाणिक नाही. मला जी लोकं सांगतात की घरच्या गोष्टी घरी ठेव त्यांना मला हेच सांगायचं आहे की मला पण फ्रीजमध्ये जाण्याची वेळ येऊ द्यायची नाही.”
दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा हत्याकांडाचा संदर्भ देत राखीने हे विधान केले होते. श्रद्धा वालकर या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडने मारून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. हे मृतदेहाचे तुकडे त्याने जवळपास सहा महिन्यात आपल्या घराच्या आजूबाजूच्या जंगलात फेकले होते.
राखीच्या आरोपांवर आदिलचे उत्तर..
आदिलने अखेरीस राखी सावंतच्या सर्व आरोपांवर एकाच पोस्टमधून उत्तर दिले आहे. त्याने म्हंटले की, “मी कोणत्या बाईच्या बद्दल वाईट बोलत नाही म्हणून मी शांत आहे पण याचा अर्थ हा नाही की मी चुकलोय. मी माझ्या धर्माचा आदर करतो.”
आदिल दुर्रानी इंस्टाग्राम पोस्ट

राखीने आदिलला दिली धमकी
आदिल पुढे लिहीतो की, “मी ज्या दिवशी माझं तोंड उघडेन आणि ती माझ्यासोबत काय वागतेय हे सांगेन तेव्हा ती कधीच स्वतःचं तोंड उघडू शकणार नाही. ती रोज लोकांसमोर येऊन मी वाईट आहे हे सांगते म्हणते की मला फ्रीजमध्ये जायचं नाही पण मी सुद्धा हे म्हणू शकतो की मला सुशांत सिंहा राजपूत व्हायचं नाही. राखी मीडियाला माझ्याशी बोलू देत नाही कारण तिला माहित आहे की मी येऊन सगळं खरं सांगून टाकेन.”
राखी सावंत व आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं.