एका कलाकाराला प्रत्येक भूमिकेसाठी खूप अभ्यास करावा लागतो, मेहेनत घ्यावी लागते, अनेकदा या कलाकारांना भूमिकेसाठी वजन कमी करावं लागतं तर कधी वाढवावं लागतं. बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार देखील प्रत्येक भूमिकेसाठी तेवढीच मेहेनत घेताना दिसतो.
अक्षय सध्या बऱ्याच चित्रपटावर काम करत आहे आणि त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी वेगवेगळ्या अटी असल्याचे समोर आले आहे. अक्षयला त्याचा आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’साठी वजन वाढवायला सांगिण्यात आलंय. अक्षयला या भूमिकेसाठी तब्बल ‘पाच किलो’ वजन वाढवायचे आहे.
View this post on Instagram
वजन वाढवायचं म्हंटलं की अनेक कलाकारांना टेंशन येत पण अक्षयने दिग्दर्शकाची ही अट हसत हसत मान्य केली आहे. एका मुलाखती त्याने सांगितले की “रक्षाबंधन’या चित्रपटासाठी मला ५ किलो वजन वाढवायचे आहे. मी अति्शय नैसर्गिक पद्धतीने माझे वजन वाढवले आहे. कधी न खायला मिळणारे पद्धर्थ मी अगदी आरामात खातोय”अक्षयने पुढे सांगितले की “अतिशय दुर्मिळ असणारा आईच्या हातचा हलवा पण मी मिटक्या मारत खाऊ शकतो”
View this post on Instagram
‘रक्षाबंधन’या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आनंद राय म्हणाले “अक्षय कुमार एक उत्तम अभिनेता आहे तसंच मी त्याच्या बरोबर काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. तसंच चित्रपटा बद्दल बोलताना अक्षय म्हणाला “हा सिनेमा बहीण भावाच्या सुंदर नात्याबद्दलची गोष्ट सांगणार आहे. मी हा चित्रपट माझ्या बहिणीला समर्पित करत आहे” तसंच ती या चित्रपटाची निर्माती सुद्धा असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान अक्षय कुमार भूमी पेडणेकरचा ‘रक्षाबंधन’ सिनेमा ५ नव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.