सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कपल धनुष आणि ऐश्वर्या हे चर्चेत आहे. या चर्चा त्यांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या आहेत. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्काच बसला आहे. पण त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न देखील अनेकांना सतावत आहे. दरम्यान, चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राम गोपाल वर्मा यांचे प्रत्येक ट्वीट हे चर्चेचा विषय ठरतो. आता त्यांनी धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर केलेले ट्वीटमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. ‘माणसाच्या आयुष्यातील दु:खाचे चक्र सतत चालू ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी समाजावर टाकलेली सर्वात वाईट प्रथा म्हणजे विवाह’ या आशयाचे ट्वीट केले आहे.
आणखी वाचा : एका महिलेला किस करताना…; शेफालीसोबतच्या किसिंग सीनविषयी किर्तीचा मोठा खुलासा

त्यापाठोपाठ त्यांनी आणखी ट्वीट केले आहेत. ‘घटस्फोट हे साजरे करायला हवेत कारण लग्न ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण एकमेकांच्या वाईट गुणांची चाचणी घेत असतो’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. राम गोपाल वर्मा यांनी केलेले ट्वीट सध्या चर्चेत असून त्यांना ट्रोल केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार घटस्फोट घेत असल्याचे समोर आले आहे. अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावपासून वेगळ्या होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने पती नागा चैतन्यला घटस्फोट दिला. त्यापाठोपाठ आता धनुष आणि पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे झाल्याची घोषणा केली. कलाविश्वातील अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांनी घटस्फोटाचे वृत्त सांगत चाहत्यांना मोठा धक्का दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आपल्या घटस्फोटाची माहिती देताना धनुषनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. धनुषनं लिहिलं, ‘मित्र, पती-पत्नी, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षं सोबत राहिलो. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा’ याशिवाय अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील केली आहे.