‘नीट बोल नाहीतर..’; अनुष्काशी चुकीच्या पद्धतीने बोलणाऱ्याला रणवीरने दिला होता दम

कधीकाळी या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडते. यातलीच एक जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग. या दोघांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना विशेष आवडत असून कधीकाळी या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. यामध्येच अनुष्कासोबत चुकीच्या पद्धतीने बोलणाऱ्या एका चाहत्याला रणवीरने फटकारलं होतं.

‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, एका कार्यक्रमात अनुष्का आणि रणवीरने हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये एका चाहत्याने अनुष्कासोबत चुकीच्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केलं. चाहत्याचं हे वर्तन पाहून रणवीर प्रचंड चिडला आणि त्याने या चाहत्याला नीट वागायला सांगितलं. ‘नीट बोलायचं, ती माझी गर्लफ्रेंड आहे. नाहीतर नाक तोडेन’, असं रणवीरने रागारागात चाहत्याला सुनावलं. त्यावेळी हे प्रकरण बरेच चर्चेत आलं होतं.

दरम्यान, या घटनेनंतर काही काळातच मतभेदांमुळे अनुष्का आणि रणवीर विभक्त झाल्याचं म्हटलं जातं. त्यांनी ब्रेकअप केला.मात्र ब्रेकअप झाल्यानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या दोघांनी ‘बॅण्ड बाजा-बारात’, ‘लेडीज वर्सेज रिकी बहल’, ‘दिल धड़कने दो’ यासारख्या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranveer singh angry on fan flirting with anushka sharma ssj