अभिनेता रणबीर कपूर सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे तो लवकरच बाबा होणार आहे. तर दुसरीकडे त्याचे ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ हे दोन बिग बजेट सिनेमे लवकरच रिलीज होणार आहेत. या दोन्ही सिनेमांच्या प्रमोशनमध्ये रणबीर सध्या व्यस्त आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत रणबीरने पिता ऋषी कपूरसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. रणबीर योग्य सिनेमाची निवड करत नसल्याचं ऋषी कपूर म्हणायचे असा खुलासा रणबीरने केला.

पत्रकार परिषदेत रणबीर म्हणाला की ऋषी कपूर यांना त्याचे सिनेमा अनेकदा ‘फालतू’ वाटायचे. मात्र ज्यावेळी रणबीरने ‘शमशेरा’ सिनेमा साईन केला त्यावेळी ऋषी कपूर आनंदी होते. यामागचं कारण म्हणजे ऋषी कपूर यांनी दिग्दर्शक करण मल्होत्रा यांच्यासोबत अग्निपथ सिनेमामध्ये काम केलं होतं.

हे देखील वाचा:“यामागचं सत्य…” सुश्मिता सेनने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चांवर भाऊ राजीवचा खुलासा

ऋषी कपूर यांनी ‘शमशेरा’ सिनेमाची एखादी तरी झलक पाहिली आहे का? असा प्रश्न रणबीरला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला, “त्यांनी करणसोबत काम केलंय. या सिनेमामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती त्यामुळे ते खूप आनंदी होते. जेव्ही मी शमशेरा साईन केला तेव्हा ते खुश झाले कारण त्यांना मी निवडलेले सिनेमा फारसे आवडायचे नाहित.”

हे देखील वाचा: ‘रॉकेट्री’ सिनेमा पाहिल्यानंतर अनुपम खेर यांनी मागितली नंबी नारायणन यांची माफी, म्हणाले…

पुढे तो म्हणाला, “ते मला म्हणायचे तुझी फिल्म चॉइस एकदम बकवास आहे. तू असे सिनेमा निवडतो जे काही लोकांपर्यंत पोहचतच नाहीत.” ऋषी कपूर यांनी शमशेराचा ट्रेलर किंवा पोस्टर पाहिलं नाही मात्र ते जिथे असतील तिथून मला पाहून गर्वाने खुश होत असतील असं रणबीर म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘शमशेरा’ सिनेमामध्ये रणबीर डबल रोलमध्ये झळकणार आहे. तर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमामध्ये तो आलिया भट्टसह बिग बी अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांच्यासोबत झळकणार आहे.