बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुखची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. अभिनेता रितेश देशमुख बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांमध्ये गणला जातो. तो सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच रितेश देशमुखने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो चक्क त्याच्या मित्रासोबत रोमान्स करताना दिसत आहे.

रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश हा एका छोट्या बोटीत असल्याचे दिसत आहे. यात रितेश हा चक्क त्याच्या मित्रासोबत रोमान्स करताना दिसत आहे. यात तो ‘ये दिल दिवाना’ हे गाणे गाताना दिसत आहे. यात रितेशचा मित्र हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता शुभांकर तावडे आहे. त्याचा हा व्हिडीओ वेड या चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचा आहे. ‘वेड शूट करतानाचा वेडेपणा !! (Madness X BTS X वेड)’, असे कॅप्शन रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे.

“आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित

रितेश आणि शुभांकर रोमान्स करत असतानाचा व्हिडीओवर जिनिलियानेही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जिनिलियाही त्या बोटीत होती. ती हे सर्व दृश्य पाहून हसताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओ शुभांकरनेही शेअर केला आहे.

अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या नावात बदल, करणी सेनेच्या मागणीनंतर YRF चा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वेड या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. यासाठी तिने वेड या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. या पूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.