RJ Mahvash reply to trolls : सोशल मीडियावर ट्रोल होणे आता एक सामान्य गोष्ट झाली आहे; परंतु काही स्टार्स असे आहेत, ज्यांना प्रत्येक आरोपाला योग्य उत्तर कसे द्यायचे हे माहीत आहे. आरजे माहवशनेही असेच काहीसे केले आहे.

अलीकडेच तिला पुन्हा एकदा सोशल मीडियावर “यूजीभाई ने इसका करिअर बना दिया”, असे म्हणत ट्रोल करण्यात आले. पण यावेळी आरजे माहवश गप्प बसली नाही. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून, त्याचे योग्य उत्तर दिले आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केले व्हिडीओ

‘यूजीभाई ने इसका करिअर बना दिया’ या कमेंटचा स्क्रीनशॉट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच ट्रोलरला सडेतोड उत्तर देत माहवश २०१९ पासून इंडस्ट्रीत काम करत आहे याचे पुरावेच दाखवते. या पोस्टला तिने, ‘जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी बोलणार नाही, तोपर्यंत कोणीही तुमच्यासाठी बोलणार नाही’, अशी कॅप्शन दिली. व्हिडीओमध्ये माहवश म्हणाली, “मी २०१९ पासून या इंडस्ट्रीत आहे. याआधी मी काय केले आहे, ते मी तुम्हाला दाखवते.” व्हिडीओमध्ये ती २०२३ मध्ये प्रॉडक्शन हाऊसमधील पदार्पणाची आणि नवाजुद्दीन सिद्दकीबरोबरच्या ‘सेक्शन १०८’ चित्रपटाची झलकदेखील दाखवते.

दुसऱ्या एका कमेंटला उत्तर देताना माहवश म्हणाली, “छोटू, तू जन्मालाही आला नव्हतास तेव्हापासून मी क्रिकेट शो होस्ट करते आहे”. व्हिडीओमध्ये माहवश महेंद्रसिंग धोनी, ख्रिस गेल, मोहम्मद कैफ, शेन वॉटसन व हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना भेटताना दिसत आहे.

यूजीभाईमुळे ती मोठ्या लोकांना भेटू लागली आहे या कमेंटवर, माहवशने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती आयुष्मान खुराणा, बादशाह, राजपाल यादव, मनोज वाजपेयी यांच्याबरोबर दिसत आहे. दुसरीकडे तिच्या प्रतिभेबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी दोन पुस्तके लिहिली आहेत. मी एका वैज्ञानिक वडिलांची मुलगी आहे. यादरम्यान, तिने चहलला तिचा चांगला मित्रदेखील म्हटले.

माहवशचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि चाहते तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.